Home ताज्या बातम्या Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Prakash Ambedkar letter bomb, not Mahavikas Aghadi but an alliance proposal to Congress

Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुक जाहिर झाली असली तरी महाविकास आघाडीत जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीच्या जागांच्या हा तिढ्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठी घोषणा केली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही, अशी मोठी घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती होणार असल्याच्या चर्चा होत्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत काही बैठका झाल्या मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही. आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आपली भुमिका जाहिर केली.

वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आम्ही पक्ष आणि विचारसरणी म्हणून.. फुले-शाहू-आंबेडकर अशी भूमिका घेत असतो. यामुळे शाहू महाराजांचं कुटुंब हे जवळचं असलेलं कुटुंब आम्ही मानतो. त्यामुळे पक्षाच्या वतीने शाहू महाराज छत्रपती यांना पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी जे काय प्रयत्न असतील ते पक्षाच्यावतीने केले जातील असे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवीन पक्ष काढला असून एक यादी आमच्याकडे दिली आहे. त्यांना आम्ही सांगितले की, आमचे महाविकास आघाडीबरोबर भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला आता काही सांगू शकत नाहीत. असे आंबेडकरांनी सांगितले. तसेच ते कोणते मतदारसंघ मागतात, हे आम्ही ऐकून घेतल्याचे देखील आंबेडकरांनी सांगितले.

महाविकास आघाडीतील जागांचा तिढा कायम असल्याने वंचित बहुजन आघाडीने अधिकृतपणे महाविकास आघाडीबरोबर जाण्यासंदर्भात भाष्य केले नाही. मात्र अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला २६ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. २६ मार्चनंतर वंचित बहुजन आघाडी आपली पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .

दरम्यान, महाविकास आघाडीचं विचारणार असाल तर तो तिढा तुम्ही त्यांनाच विचारा. कारण आम्हाला त्याबाबत माहिती नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीत युती न झाल्यास महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

मोठी बातमी : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली

ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

किल्ले शिवनेरीवर जाताय? वन विभागाने घेतलेला निर्णय आवश्यक वाचा!

ब्रेकिंग : बिहार कोसी नदीवरील मोठा पूल कोसळला, एक ठार,अनेक जखमी

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

Exit mobile version