Thursday, May 2, 2024
Homeग्रामीणकोल्हापूर : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : जिल्ह्यातील  राधानगरी धरणाचे ३ व ६ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे आज सायंकाळी ७ वाजता उघडले. स्वयंचलित दरवाज्यातून २८४६ क्युसेक्स आणि विद्युत विमोचकातून १४०० क्युसेक्स असे एकूण ४२५६ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरु आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रताप माने यांनी दिली. 

नदीकाठच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय