Tuesday, May 21, 2024
Homeकृषीठाणे शहरातील आदिवासींची पुन्हा एकदा वनविभागावर धडक; या आहेत मागण्या.

ठाणे शहरातील आदिवासींची पुन्हा एकदा वनविभागावर धडक; या आहेत मागण्या.

प्रतिनिधी :- ठाणेे शहरातील आदिवासींच्या वनजमिनीच्या प्रश्नासंदर्भात पुन्हा एकदा

अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली वनविभाग कार्यालयावर धडक मारली. 

             ठाणे शहरातील येऊरच्या डोंगरावर शेती करणाऱ्या आदिवासींच्या वनपट्ट्यांवर वनखात्याने फिरवलेल्या नांगराविरोधात किसान सभेच्या नेतृत्वाखाली ५ जूनला किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी शांततापूर्ण निदर्शने केली आणि वनखात्याने मागवलेल्या पुराव्यांपैकी किमान पुरावे सादर केले.

मात्र तरीही त्यांना डोंगरावर जाण्यास मज्जाव करू पाहणाऱ्या वनखात्यावर पुन्हा एकदा ९ जूनला जमिनी कसणारे सर्व आदिवासी जाऊन धडकले. किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड किसन गुजर यांच्या नेतृत्वाखाली प्राची हातिवलेकर, दत्तू खराड आदींच्या शिष्टमंडळाने वनाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. 

           सर्व शेतकऱ्यांनी आजपासून रोज डोंगरावर जाऊन सामूहिक शेती करण्याचा आणि आपली संघटित ताकद दाखवण्याचा निर्धार केला.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय