Monday, May 6, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला आळंदीत वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्व संध्येला आळंदीत वृक्षारोपण

अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग लोहगावचा उपक्रम

आळंदी / अर्जुन मेदनकर
: अजिंक्य डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसच्या अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग लोहगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने आळंदीतील नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रमांक एक मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे पूर्व संध्येला वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ, पेरु, आंबा अशा विविध देशी वृक्षाचे रोपण करण्यात आले.



या प्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक दिलीप घुले, प्राध्यापिका भाग्यश्री ढाकूलकर, डॉ प्रगती देवरे, प्राध्यापिका आर्या, मनीष ढाकूलकर आदींनी वृक्षारोपण श्रमसंस्कार शिबिर यशस्वीतेस परिश्रम घेतले. वृक्षारोपणास आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, ग्रीन अवनी फाउंडेशनचे प्रशांत लागे, मुख्याध्यपक संतोष मरभळ, राजेश कराळे, महेश नेहेर शाळेतील सर्व शिक्षकांचे विशेष सहकार्य केले.



महाविद्यालयाचे संचालक डॉ कमलजीत कौर व प्राचार्य डॉ फारुक सय्यद यांनी पर्यावरण दिना निमित्त राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी केलेल्या वृक्षारोपण श्रमसंस्कार शिबिराचे विशेष कौतुक केले. अजिंक्य डी.वाय.पाटील कॉलेज लोहगाव यांचे तर्फे आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक १ शालेय मैदान परिसरात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन पूर्वसंध्येला स्वच्छता, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनासाठी सामाजिक बांधिलकीतून जनजागृती करण्यात उत्साहात करण्यात आली. या नंतर माऊली मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख विधीतज्ञ विकास ढगे पाटील यांचे हस्ते लोहगाव युनिट चा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय