Tuesday, May 21, 2024
HomeNewsमोशी येथे आज (11 फेब्रुवारी 2023) गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे महासत्संग...

मोशी येथे आज (11 फेब्रुवारी 2023) गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांचे महासत्संग प्रबोधन

महारोजगार मेळावा,व्यवसाय मार्गदर्शन,भव्य आरोग्य शिबीर,सर्वधर्मीय वधुवर परिचय मेळावा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलक
र:अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 फेब्रुवारी ला आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मैदान(PIECC) मोशी,पुणे येथे महासत्संग मेळावा आयोजित करण्यात आला आहे.महारोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्या मध्ये चांगल्या पगाराच्या सुमारे 11 हजार जागांसाठी नोकर भरतीचे आयोजन विनामूल्य आहे.

सामाजिक विभागाच्या विवाह संस्कार विभाग अंतर्गत सर्व जाती धर्मीय वधू-वर विवाह नाव नोंदणी व मार्गदर्शनाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये विनामूल्य विवाह इच्छुकांची नावनोंदणी करुन साठ हजारहून अधिक स्थळांची माहिती उपलब्ध करुन 5 हजार विवाह जमवण्यात येणार आहेत. भव्य आरोग्य शिबिरात 200 पेक्षा अधिक नामांकित डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोग चिकित्सा शिबीर आयोजित केले आहे.युवक युवतींना व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन तसेच विविध उद्योगांचे 500 हुन अधिक स्टॉल उपलब्ध करण्यात आले आहेत.

श्री स्वामी समर्थ सेवा सत्संग आयोजन समिती पुणेचे संचालक सतिश मोटे यांनी सांगितले की, या महासत्संग सोहळ्यास 11 लाख भाविक,स्वामीभक्त, सेवेकरी उपस्थित राहणार आहेत. 150 एकर परिसरात बसेस, कार, मोटर सायकल पार्किंग व्यवस्था,50 एकर परिसरात भव्य स्टेज व बैठक व्यवस्था,11 लाख भाविक सेवेकऱ्यांना मोफत अन्नदान व पिण्याच्या पाण्याचे वाटप असे नियोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून महासत्संग मेळाव्यात विश्वविक्रमी श्री गणपती अथर्वशीर्ष पठण, सव्वा कोटी श्री प्रज्ञाविवर्धन स्तोत्र पठण, श्री तुकारामांचे अभंग पठण व पसायदान पठण असे बहुविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे संयोजन सेवेकरी सतीश मोटे,अशोक जाधव,सचिन थोरवे,सचिन बिरले संयोजक रामेश्वर निकम,विश्वनाथ पवार,महेश पोळ,देविदास भोंग,बंडूजमदाडे,संजय हजारे,संतोष खिरे,संजय महामार्गे,लकीचंद गुजर,शिवाजी केदारी,कुलदीप राठोड,गोरक्षनाथ काकडे,शिवाजी साधुले व सर्व सेवेकरी महिला पुरुष यांनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय