Thursday, May 9, 2024
Homeजिल्हानांदेड जिल्ह्यातील तीन रणरागिणींची आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य कमिटीवर निवड

नांदेड जिल्ह्यातील तीन रणरागिणींची आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या राज्य कमिटीवर निवड

नांदेड : सिटू संलग्न आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे तिसरे राज्यव्यापी अधिवेशन दिनांक 7 व 8 मे रोजी वर्धा येथे संपन्न झाले. सदर अधिवेशनात 19 पदाधिकारी सर्वानुमते एकमताने निवड करण्यात आली. तसेच 74 जणांची नवीन राज्य कार्यकारणी मंजूर करण्यात आली. त्या राज्य कमिटीमध्ये नांदेड जिल्ह्यातील तीन लढाऊ रणरागिनणी यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

नांदेड जिल्ह्यातील कॉ.शिला ठाकूर यांची राज्य उपाध्यक्षपदी तर राज्य कमिटी सदस्य म्हणून वर्षा सांगळे व सारजा कदम यांची राज्य कमिटी सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. सदरील अधिवेशनात राज्य अध्यक्षपदी कॉम्रेड आनंदी अवघडे (सातारा) तर महासचिव म्हणून कॉम्रेड पुष्पा पाटील सोलापूर यांची निवड एकमताने करण्यात आली आहे.

सरकारी भरती : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत 76 रिक्त पदांसाठी भरती

या निवडीबद्दल त्यांचे जिल्हाभरातून अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वरील तिन्ही महिला पुढाऱ्यांचा संयुक्त सत्कार सीटू नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने लवकरच करण्यात येणार असल्याचे सिटू जिल्हा कमिटीच्या अध्यक्ष कॉ. उज्वला पडलवार व जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी सांगितले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय