Monday, May 20, 2024
Homeराज्यसरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वाढवली "इतक्या" दिवसाची मुदत

सरपंच व सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वाढवली “इतक्या” दिवसाची मुदत

मुंबई : राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका माहे जानेवारी २०२१ मध्ये पार पाडण्यात आल्या आहेत. यात राखीव प्रवर्गातील ग्रामपंचायत सरंपच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना विशेष बाब म्हणून जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात पुनश्च एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. सबब जात वैधता प्रमाणपत्र १७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करण्याबाबतची घोषणा ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागास प्रवर्गाकरिता राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद आहे. मात्र वेळेत जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित राहू नये यासाठी सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याचा शेवटचा दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ असा करून निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

सरकारी भरती : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत 76 रिक्त पदांसाठी भरती

त्या अनुषंगाने जानेवारी २०२१ मध्ये झालेल्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या उमेदवारांनी पडताळणी समितीकडून दिलेले जातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२२ असा होता. तथापि माहे जानेवारी २०२१ च्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणावर राखीव प्रवर्गातून उमेदवार निवडून आले आहेत. त्यात राज्यातील कोव्हीड-१९ च्या निर्बंधामुळे विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध होवू शकले नाही. त्यामुळे राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांना पदापासून वंचित राहू नये यासाठी विशेष बाब म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरती, आताच अर्ज करा !

10 वी पास आहात ? मग आजच अर्ज करा ! आसाम राइफल्स मध्ये तब्बल 1380 पदांसाठी मेगा भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय