Saturday, May 18, 2024
Homeराजकारणराजकीय सत्ता संघर्षानंतर ,"हे"आहेत झारखंडचे नवे मुख्यमंत्री

राजकीय सत्ता संघर्षानंतर ,”हे”आहेत झारखंडचे नवे मुख्यमंत्री

झारखंड : झारखंड मुक्ती मोर्चाचे विधिमंडळ गटनेते चंपई सोरेन यांनी आज शुक्रवारी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे त्यांना शपथ दिली. चंपई सोरेन यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर आलम आणि राष्ट्रीय जनता दलचे नेते सत्यानंद भोक्ता यांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. झारखंड मधील सत्ता नाट्यावर आज पडदा पडला असून नवीन सरकार स्थापन झाले आहे. हे 5 फेब्रुवारीला बहुमत सिद्ध करणार असून नवा राजकीय अध्याय या निमित्ताने लीहण्यात येणार आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पीएमएलए कोर्टाने आज शुक्रवारी पाच दिवसांची ईडी कोठडी दिली. ईडीने गुरुवारी हेमंत सोरेन यांच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टाने त्यांना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी दिली होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय