Monday, May 20, 2024
Homeराज्यअंतिम वर्षाच्या परिक्षा संदर्भात मोठा निर्णय; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली माहिती.

अंतिम वर्षाच्या परिक्षा संदर्भात मोठा निर्णय; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली माहिती.

(प्रतिनिधी) :- महाविकास आघाडीने विद्यार्थी हित लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यपालांच्या परिक्षा घेण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

          परंतु उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले होते, “आम्ही निर्णयावर ठाम आहोत. महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने असल्याचे सिध्द झाले आहे. 

        “अंतिम वर्ष परीक्षांबाबत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक झाली. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला, व्यावसायिक अभ्यासक्रमांबाबतही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय रेग्युलेटरी बॉडींना कळवण्याचा निर्णय झाला.” असे ट्विट उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.

    ऐटीकेटी बाबतही लवकर निर्णय घेतला जाण्याचे सुतोवाच त्यांनी दिले आहे. कुलगुरू आणि संबंधित अधिकाऱ्यांची आणखी एक बैठक एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच बोलावण्यात येणार आहे.  हा मुद्दा गुंतागुंतीचा आहे आणि सर्व कायदेशीर बाबी लक्षात घेऊन त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय