Saturday, May 18, 2024
Homeबॉलिवूड'पंचायत 3' ची प्रतीक्षा संपली! याच महिन्यात "या" दिवशी रिलीज होणार नवीन...

‘पंचायत 3’ ची प्रतीक्षा संपली! याच महिन्यात “या” दिवशी रिलीज होणार नवीन सीझन

‘पंचायत’ ही एक अशी सीरीज आहे, ज्याच्या पुढच्या सीझनची प्रत्येकजण वाट पाहत आहे.काही दिवसांपूर्वीच वेब सीरिजचे दोन नवीन पोस्टर शेअर करण्यात आले होते. ज्यामध्ये जितेंद्र कुमारचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता. यात ही सीरीज कधी लॉन्च होणार, याबाबत महिवटी देण्यात आली नव्हती.

आता चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण या महिन्यात तुम्हाला ‘पंचायत’ सीझन 3 पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात होणार आहे. livehindustan ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पंचायत 3’ 15 जानेवारीला रिलीज होणार आहे. प्राइम व्हिडिओ इंडियाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही. मात्र प्राइम व्हिडिओ इंडोनेशियावर ‘पंचायत 3’ ची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.

यापूर्वी पंचायत 3 चे दोन पोस्टर शेअर करण्यात आले होते. एकामध्ये जितेंद्र कुमार पंचायत सचिवाच्या भूमिकेत दिसत आहे. तो बाईकवर बसला असून त्याच्या मागे त्याची बॅग आहे. तो फुलेरा गाव सोडून जात असल्याचे फोटोत दिसते. दुसऱ्या फोटोत दुर्गेश कुमार, अशोक पाठक आणि बुल्लू कुमार बाकावर बसलेले आहेत. त्याच्या मागे भिंतीवर लिहिले आहे, ‘ठोकर लगती है तो दर्द होता है, तभी तो मनुष्य सीख पाता है.’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय