Friday, November 22, 2024
Homeसंपादकीयजनभूमी पडताळणीफेकन्यूज : जवानाच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याचा "तो" व्हिडिओ भारत वा...

फेकन्यूज : जवानाच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याचा “तो” व्हिडिओ भारत वा पाकिस्तानचा नाही ; वाचा सविस्तर !

फेकन्यूज : भारतीय जवानाच्या डोक्यात नक्षलवाद्यांनी गोळी झाडल्याचा एक व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे, परंतु तो व्हिडिओ भारत वा पाकिस्तानचा नाही.

काय आहे दावा

त्या व्हिडिओ मध्ये एक बंदूकधारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यात बंदुकीची गोळी मारताना दिसत आहे. त्यात दावा केला जात आहे की, “सुट्टीवरून जाताना जवानांना बस मधून बाहेर उतरवून नक्षलवाद्यांनी गोळी मारली” असा दावा आहे. सोबतच या व्हिडिओचे ठिकाण म्हणून त्यावर “पंजाब, पंजाब, पाकिस्तान” असा टॅग लावण्यात आला आहे.

पडताळणी

“महाराष्ट्र जनभूमी”च्या टीमने या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी सुरुवात केल्यानंतर आमच्या टीमला दोन दिवसांपूर्वी दोन वेगवेगळ्या युट्युब चॅनेलवर ही व्हिडिओ अपलोड केलेली दिसली. गुगलच्या सर्च इंजिनचा वापर करून व्हिडिओची अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता, एका संकेतस्थळाचा दुवा हाती लागला त्या संकेतस्थळावर या व्हिडिओचा मूळ व्हिडिओ भेटला.

मूळ व्हिडिओ

मूळ व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या व्हिडिओमध्ये बोलली जाणारी भाषा स्पॅनिश असल्याचे निदर्शनास आले. मूळ व्हिडिओ (https://strana-krovi.com/videos/41974-sneslo-pol-cherepa) या संकेतस्थळावर गेल्या वर्षी १४ एप्रिल २०२० रोजी शेअर करण्यात आला आहे. मात्र अद्याप लोकेशनची पडताळणी होऊ शकली नाही. त्या व्हिडिओ मध्ये बोलली जाणारी भाषा स्पॅनिश असल्याने आणि मूळ व्हिडिओ रशियन वेबसाईटवर असल्याने भारताचा याच्याशी काही संबंध नसल्याचे दिसते.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, भारतीय जवानाच्या नावे शेअर होणारा हा व्हिडिओ भारतातील नसून यासोबत जवानांचा काही संबंध नाही. त्यामुळे त्या व्हिडिओ मध्ये केलेला दावा खोटा आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय