Thursday, May 2, 2024
Homeजुन्नरJunnar: निमगिरीच्या शेतकऱ्यांची 45 हजार 500 रूपयांची थेट बँकेतून चोरी

Junnar: निमगिरीच्या शेतकऱ्यांची 45 हजार 500 रूपयांची थेट बँकेतून चोरी

Junnar (रफिक शेख) : सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी बँकेत गेलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्यांची बँकेतून चोरी झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी जुन्नर (Junnar) पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सखाराम विठ्ठल लांडे (वय 70 वर्ष धंदा शेती रा. निमगिरी, ता. जुन्नर, जि. पुणे) यांनी फिर्यादी दिली असून 45 हजार 500 रूपये इतकी रक्कम चोरीला गेली आहे‌.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी हे सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी जनता सहकारी बँक जुन्नर येथे गेले असता त्यांनी सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी सोबत आणलेली रक्कम एक लाख पन्नास हजार पाचशे रुपये मोजून त्याप्रमाणे पैसे भरणा स्लिप बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून भरून घेऊन पैसे व स्लिप घेऊन पैसे भरणा करण्याचे रांगेत बसले. असे असताना तेथे दोन अनोळखी इसम येऊन थांबले व ते फिर्यादीस म्हणाले की आम्हाला तुमच्या नोटांचे नंबर बघायचे आहे असे म्हणून त्यांनी फिर्यादीचे हातातील पैसे खाली फरशीवर पाडून त्यातील काही नोटा खिशात घालून जनता सहकारी बँक जुन्नर येथून मुद्दाम फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरी करून चोरून नेले आहे. यामध्ये 500 रूपयांच्या 97 नोटा असे एकूण 48 हजार 500 रूपये चोरीला गेले आहेत.

याप्रकरणी दोन अनोळखी इस्मानविरुद्ध भा.द.वि. कलम 379, 34 प्रमाणे जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार सहा.फौजदार गीजरे करत आहेत.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

मोठी बातमी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर ईडीची कारवाई, मालमत्ता केली जप्त

ब्रेकिंग : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

ब्रेकिंग : डॉ. अमोल कोल्हे आईचा आशिर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार

ब्रेकिंग : भाजप खासदाराचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश

ब्रेकिंग : मुसळधार पावसाने दुबईत महापूर

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

IFSCA : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण अंतर्गत भरती


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय