Sunday, May 19, 2024
Homeराजकारणमाजी खासदार आढळराव-पाटील यांना पक्षाने दिली ‘ही’ ऑफर

माजी खासदार आढळराव-पाटील यांना पक्षाने दिली ‘ही’ ऑफर

पुणे : शिंदे गटाने केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेनेचे तब्बल ४० आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सामील आहेत. त्यामुळे शिवसेनेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अशात शिवसेनेचे माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्याने आढळराव-पाटील यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती, मात्र काही वेळातच ही कारवाई मागे घेण्यात आली.

आमदारांच्या बंडानंतर आजी-माजी खासदारही शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या. अशातच माजी खासदार आढळराव-पाटील यांच्यावर अगोदर कारवाई नंतर पक्षाने घेतलेली माघार यावरून त्यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली. या राजकिय घडमोडींनंतर मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी आढळराव पाटील यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी ऑफर आम्ही त्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.

आढळराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, मंगळवारी मी आमचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत आणि विनायक राऊत यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी मला पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करण्यास सांगितले आहे. परंतू मी त्यांना शिरूर मधूनच उमेदवारी देण्याची विनंती केली आहे. पण पक्षाने आदेश दिल्यास मी त्याचा विचार करेल असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या या ऑफरमुळे पुढील निवडणूका या महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचे हे संकेत असल्याची चर्चा आहे. तसेच संभाव्य महाविकास आघाडीच्या या जागावाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागाही राष्ट्रवादीकडे तर पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे जाणार असल्याचे या निमित्ताने आता स्पष्ट झाले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय