Sunday, May 12, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे अभिवादन

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे अभिवादन

पिंपरी चिंचवड : भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले. या अभिवादना वेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे म्हणाले कि, श्यामाप्रसाद मुखर्जी यांची प्रखर राष्ट्रभक्ती युवकांसाठी प्रेरणादायी आहेत. तसेच भारतीय राजकारणातील एकप्रज्ञावंत शिक्षणतज्ञ, प्रखर राष्ट्रभक्त, ओजस्वी वक्ता, कुशल संघटक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. मुखर्जी सदैव प्रेरणादायी राहतील अशा भावना यांनी व्यक्त केली.

पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार उमाताई खापरे, माजी महापौर माई ढोरे, राहुल जाधव, नितीन काळजे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, उत्तम केंदळे आदी उपस्थित होते.

संपादन – क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय