Wednesday, May 22, 2024
HomeNewsशिवरायांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला, शिवप्रेमींचा संताप; रोहित पवारांची 'ही' मागणी

शिवरायांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला, शिवप्रेमींचा संताप; रोहित पवारांची ‘ही’ मागणी

अमेरिकेतील सॅन जोस शहरातील एक बागेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. ग्वाडालुपे रिव्हर पार्क हा भाग प्रसिद्ध आहे या भागातून हा पुतळा गायब असल्याचे तेथील प्रशासनाने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे.
या धक्कादायक प्रकारानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार रोहित पवारांनीही टि्वटद्वारे राज्य सरकारकडे मागणी केली आहे.

कॅलिफोर्नियातील सॅन जोस पार्क विभागाकडून टि्वटद्वारे याचा खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘ग्वाडालुपे रिव्हर पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला आहे. याबाबत माहिती सांगताना आम्हाला वाईट वाटत असल्याचे ते म्हणाले आहेत मात्र, हा पुतळा कधी चोरीला गेला? याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सॅन जोस शहरातील एक बागेतून चोरीला गेल्यानंतर शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याचवेळी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी’सिस्टर सिटी’मोहिमेअंतर्गत पुणे शहराने अमेरिकेतील सॅन जोस शहराला शिवाजी महाराजांचा पुतळा दिला. हा पुतळा सॅन जोस शहरातील उद्यानात बसवण्यात आलेला होता.

परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा आपल्या आणि तेथील मराठी जनतेच्या भावनेचा विषय आहे.याबाबत लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी राज्य सरकारने भारतीय परराष्ट्र खात्याकडे करावी, ही विनंती असं टि्वटमध्ये म्हटलं आहे.

अमेरिकेतील हा महाराजांचा पुतळा पुण्यातून भेट म्हणून देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेतील मराठा शासकाचा हा एकमेव पुतळा होता. या घटनेनंतर संपूर्ण शहरामध्ये नाराजी पसरली असून शिवप्रेमींनी दु:ख व्यक्त केलं आहे. दरम्यान, आम्ही पुतळ्याचा शोध घेत असून शक्य तितक्या लवकर पुतळा शोधू अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे. या घटनेची चौकशी सुरू असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय