Tuesday, May 7, 2024
Homeराज्यब्रेकिंग : मुंबईत अतिरेकी घुसल्याचा मुंबई पोलिसांना फोन

ब्रेकिंग : मुंबईत अतिरेकी घुसल्याचा मुंबई पोलिसांना फोन

मुंबई : मुंबईत अतिरेकी घुसल्याचा फोन मुंबई पोलिसांना आलेला आहे, या फोनमुळे पोलिस यंत्रणा अलर्टवर आली आहे. दुबईहून शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आले, अशी माहिती फोनवरून पोलिसांना देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून शुक्रवारी पहाटे तीन अतिरेकी मुंबईत घुसल्याचा फोन मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात फोन आला होता. राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळत आहे. राजा ठोंगे या व्यक्तीने मुंबईत आलेल्या अतिरेक्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा केला आहे. राजा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तिघांपैकी एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या तिघांचाही बेकायदेशीर व्यवसाय आहे. राजा ठोंगे हे पुण्याचे असून याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्यांना पुन्हा कॉल केला असता त्यांचा फोन बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, यापुर्वी पुण्यातील कोरेगाव पार्कमधील गुगल ऑफिसमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल आला होता. या खोट्या कॉलमुळे परिसरात खळबळ उडाली होती. नंतर हा कॉल खोटा असल्याची माहिती समोर आली होती.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय