Wednesday, September 28, 2022
Homeजनमतगाव तेथे ग्रंथालय हा उपक्रम राबवावा

गाव तेथे ग्रंथालय हा उपक्रम राबवावा

गाव तेथे ग्रंथालय हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. आपण शेतीप्रधान देशात राहतो. आपल्या राज्याच्या अर्थकारणात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा ही सहभाग प्रभावी आहे, यात तिळमात्र शंका नाही. प्रत्येक गावात ग्रंथालय उभारणे योजना अंमलात आणणे नक्कीच फायदेशीर आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा शहरी भागाबरोबरच एकविसाव्या शतकातील जगाशी संबंध येईल.

ग्रंथालयामुळेच विविध महापुरुषांचे आत्मचरित्र काव्य थोर संतांचे ग्रंथ यांच्या वाचनामुळे त्यांची ऊर्जा वाढेल. हीच उर्जा ग्रामीण भागाच्या विकासासाठी नक्कीच उपयोगी पडेल. ग्रंथालयामार्फत ग्रामीण युवकांना विविध क्षेत्रातील सखोल ज्ञान मनोरंजन, संस्कृती, कला, क्रीडा आणि आरोग्य यांचा परिचय होईल. ते युवकांचा सर्वांगीण विकासासाठी नक्कीच प्रभावी माध्यम ठरेल. त्याचबरोबर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील युवकांना स्पर्धा परीक्षेमध्ये ही आपले भविष्य उज्वल करता येईल. 

ग्रंथालयातील दैनंदिन वर्तमानपत्रांमध्ये ग्रामीण लोकांना समाजातील राजकारणातील दैनंदिन घडामोडी याची सखोल माहिती मिळेल व त्यांच्या मानसिक विकासासाठी ग्रंथालय ही आपली कामगिरी बजावतील. शासनाकडून सध्या शहरी भागाबरोबरच विशेषता ग्रामीण भागाच्या विकासाची विविध प्रभावी योजना अंमलात आणण्यात येत आहे. त्यामध्ये परवलीचा अक्षता आरोग्य संवर्धन वृक्षलागवड दुष्काळावर उपाय योजना अंमलात आणण्यासाठी ग्रंथालय हे एक प्रभावी माध्यम ठरेल सध्या ग्रामीण भागातील युवकांना बरोबरच महिलांचाही सहभाग सर्व क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. 

शासनाच्या योजनेनुसार महिलांनाही सर्व क्षेत्रांमध्ये न्याय देणे व त्यांचा विकास करणे हे आहे. तेव्हा महिलांनी यांचे गांभीर्य ओळखून ग्रंथालयामार्फत या संधीचा फायदा घ्यावा व आपला विकास करावा. गाव तेथे ग्रंथालय हा उपक्रम नक्कीच फायदेशीर आहे.

– अमोल मांढरे

– वाई, सातारा

– 7709246740

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय