Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा आणि त्यांच्या स्मृतीस्थळांचा वारसा जपला पाहिजे-वैजनाथ शिरसाट

महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा आणि त्यांच्या स्मृतीस्थळांचा वारसा जपला पाहिजे-वैजनाथ शिरसाट

आम आदमी पार्टीच्या वतीने महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.११
– आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी येथे महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.या वेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी बोलतांना म्हटले की,महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारावरती चालणारे राज्य आहे.त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले परंतु आज त्या किल्ल्यांची दूरअवस्था झालेली आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींसाठी काढलेली भिडे वाड्यातील शाळा आज मोडकळीस आलेली आहे. अनेक वेळा पाठ-पुरवठा करूनही सरकार याकडे दुर्लक्ष करते.

आज महाराष्ट्रामध्ये नको त्यांचा गौरव होत आहे.महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा आणि त्यांच्या स्मृतीस्थळांचा वारसा जपला पाहिजे.भाजप सरकार हे जातीवादी सरकार आहे.महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त मागणी आहे फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्कार समर्पित करवा.११ एप्रिल महात्मा फुले जयंती राजस्थान सरकारच्या धर्तीवर ती महाराष्ट्रात ही शासकीय सुट्टी देण्यात यावी.अशी मागणी आम आदमी पार्टीचे संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी केली आहे.
महात्मा जोतीराव फुले हे मराठी लेखक, विचारवंत,समाजसुधारक व यशस्वी उद्योजक होते.शेतकरी,बहुजन समाजच्या उन्नतीसाठी स्त्रीशिक्षणासाठी त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली.कर्मकांडाला महत्व देणाऱ्या पुरोहितशाहीला त्यांनी वैचारिक पातळीवर विरोध केला.विवाहातील पारंपरिक प्रथा मोडीत काढून सत्यशोधक विवाहाला प्रोत्साहन दिले.


त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली.
महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली.
आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.असे वैजनाथ शिरसाट यांनी सांगितले.

यावेळी आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे,वैजनाथ शिरसाट, रविराज काळे,संतोष इंगळे, ऋषिकेश कानवटे,गोविंद माळी, ब्रह्मानंद जाधव,यलाप्पा वालदोर,सुरेश बावनकर,किसन चावऱ्या,सीताताई केंद्रे,प्रकाश हगवणे,अमर डोंगरे,कमलेश रणवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय