Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी

सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी

घोडेगाव : सिटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी गायकवाड यांना भेटून अमृता आहार योजनेतील अडचणी सोडवण्यासाठी निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी सदर प्रश्न मार्गी लागल्याची माहिती संघटनेचे जिल्हा सल्लागार लक्ष्मण जोशी यांनी सांगितले. The issue of Anganwadi employees through CITU Affiliated Anganwadi Employees Association

जोशी म्हणाले, डॉ.अब्दुल कलाम अमृता आहार योजनेचे २०१६ ते २०२२ पर्यत ८ वर्षाचे मूल्यमापन कण्याचे आदेश आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी दिले होते. परंतु, आजपर्यंत या योजनेचे कोणतेही प्रशिक्षण दिले नाहीी, त्यामुळे अनेक अडचणी सेविकांना दप्तर भरताना अडचणी येतात. त्यामुळे मूल्यमापन आदेश रद्द करण्याचा निर्णय प्रकल्प अधिकारी यांच्या बैठकीत घेण्यात आला ‌‌.

त्याप्रमाणे, अंगणवाडी अमृता आहार योजनेचे सेविका आणि मदतनीस यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करावी, दप्तर खरेदी खर्च मिळावा, इंधन खर्च मिळवा, तसेच अमृता आहारात योजनेत येणाऱ्या सर्व वस्तूच्या खरेदीसाठी मिळणार निधी हा आजचा महागाई निर्देशांक नुसार मिळावा या मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी गायकवाड यांनी या आठवड्यात एकात्मिक महिला बाल विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी, सर्व पेसा क्षेत्रातील प्रवेक्षिका, आणि संघटनेचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक जुन्नर पंचायत समिती कार्यालयात घेण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे‌.

सदर मागण्या सोडवण्यामध्ये दिरंगाई झाल्यास २ नोव्हेंबर २०२३ पासून बेमुदत आंदोलन इशारा संघटनेचे दिला आहे.

यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा सल्लागार लक्ष्मण जोशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जुन्नर तालुका सचिव गणपत घोडे, एस एसएफआय विद्यार्थी संघटनेचे नेते राजेंद्र शेळके, सविता ताजने, मीना मस्करे, साधना मोजाड, छाया चकवे, सुशीला काळे, रुख्मिनी लांडे, नंदा रघतवान, संगीता तांबे, नामाबाई जाधव आदींसह उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय