Monday, May 6, 2024
Homeग्रामीणराज्यातील पहिले खुलं वाचनालय; पक्षकारांसाठी असणार वेटींगरुममध्ये ग्रंथालय

राज्यातील पहिले खुलं वाचनालय; पक्षकारांसाठी असणार वेटींगरुममध्ये ग्रंथालय

सातारा : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने आज कौटुंबिक न्यायालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रथमच महाराष्ट्रात कुटुंब न्यायालय सातारा येथे कौटुंबिक न्यायालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यातील पहिले खुलं ग्रंथालय पक्षकारांसााठी सुरु करण्यात आले आहे. 

हा कार्यक्रम, प्रमुख न्यायाधीश गोविंद वायाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे  उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले तर बालाजी वाचनालय सातारचे संस्थापक प्रताप गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

कुटुंब न्यायालयात येणारे पक्षकार हे मानसिकरित्या खचलेले असतात. त्यांच्या मनात अनेक नकारात्मक विचार सुरु असतात न्यायालयात आले असतांना प्रचंड तणावाखाली दिसून येतात अशा वेळी ते वेटींग रुममध्ये बसले असतात. त्यावेळी त्यांनी नकारात्मक विचार सोडून सकारात्मक रहावे यासाठी वेटींगरुममध्ये एक ग्रंथालय सुरु करण्यात आले.

जेणेकरुन ते चांगली पुस्तके वाचु शकतील आणि आपला तणाव, चिंता, नैराश्य दूर करु शकतील हा त्या मागचा उद्देश ठेवून ग्रंथालय सुरु करण्यात आले आहे. न्यायाधीश गोंविद वायाळ यांनी अध्यक्षीय भाषणात वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश सांगितला. न्यायालयात सुरु करण्यात आलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच गोरे यांनी ग्रंथालय विषयी माहिती सांगून ग्रंथालयास पुस्तके भेट दिली. या कार्यक्रमास विवाह समुपदेशक डॉ. शेखर पांडे, विधीज्ञ वर्ग, पक्षकार, कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय