औरंगाबाद:-औरंगाबाद शहरात लागू करण्यात आलेल्या जनता संचारबंदीला काल दुसऱ्या दिवशीही नागरिकांनी प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. रस्ते निर्मनुष्य होते तसंच बाजारपेठाही पूर्णपणे बंद होत्या. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं दिसून आलं. शहराच्या परिस्थितीवर विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि पोलिस आयुक्त लक्ष ठेवून आहेत. येत्या अठरा तारखेपर्यंत ही जनता संचारबंदी लागू राहणार आहे.
या संचारबंदी काळात विनाकारण फिरणाऱ्या १५६ वाहनधारकांची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली तसंच २१ गुन्ह्यांची नोंद केली असल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ नागनाथ कोडे यांनी सांगितलं.
दरम्यान,औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण शहरातही वाढती बाधितांची संख्या लक्षात घेऊन १४ ते २० जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.