Sunday, May 19, 2024
HomeNews‘स्वच्छ, निर्मळ इंद्रायणी’ संकल्पना प्रत्यक्षात येणे आवश्यक – सचिन गिलबिले

‘स्वच्छ, निर्मळ इंद्रायणी’ संकल्पना प्रत्यक्षात येणे आवश्यक – सचिन गिलबिले

गिलबिले यांनी स्वखर्चातून लावले इंद्रायणी नदीकाठी जनजागृती सुचनाफलक

आळंदी
: श्रीक्षेत्र आळंदी-देहूच्या कुशीतून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीला वारकऱ्यांच्या मनात अतिशय पवित्र स्थान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत इंद्रायणीचे प्रदूषण चिंतेचा मुद्दा झाला आहे. तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थाकडे वाटचाल होत असताना ‘स्वच्छ, निर्मळ इंद्रायणी’ संकल्पनाही प्रत्यक्षात येणे आवश्यक आहे असे मत आळंदी नगरपरीषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी व्यक्त केले.सचिन गिलबिले यांनी स्व:खर्चातुन आळंदी येथील इंद्रायणी नदी स्वच्छ राहवी यासाठी काठावर जनजागृतीपर सुचना फलक लावण्यात आले आहे.

‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ या उक्तीप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायात वंदनीय स्थान प्राप्त केले आहे. हे दोघेही अवघ्या महाराष्ट्राचे लाडके संत होत. या दोघांचीही कर्मभूमी आळंदी आणि देहू होत. योगायोग म्हणजे या दोन्ही भूमीतून इंद्रायणी नदी वाहते. त्यामुळे तिचे वारकरी सांप्रदायिक माहात्म्य अलौकिक होय. या नदीत स्नान करणे म्हणजे मानवी देहाला पवित्र करून घेणे होय, अशी भाविकांची भावना आहे. मात्र, आजमितीस इंद्रायणी नदी फक्त कागदावर पवित्र नदी राहिली आहे. या नदीच्या उगमापासून संगमापर्यंत प्रदूषणाचा विळखा पडला आहे. केवळ नदीच नव्हे, तर काठावर आणि त्या लगतचा परिसर दुर्गंधीने व्यापलेला आहे. त्यामुळे नदीला नदी म्हणायची की नाला हेच समजत नाही. प्रदूषण थांबविण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी पाठपुरावा केला. परंतु, अपेक्षित सुधारणा होत नाही.याउलट प्रदूषण समस्या दिवसेंदिवस जटील होत आहे. त्यावर चिंतन करून प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे असे माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले यांनी मत व्यक्त केले.


Lic

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय