Monday, May 6, 2024
HomeNewsगोवर साथीचा संसर्गजन्य रोग आहे-प्रतिबंध व उपचारासाठी आयसोलेशन वार्ड त्वरीत सुरू करा....

गोवर साथीचा संसर्गजन्य रोग आहे-प्रतिबंध व उपचारासाठी आयसोलेशन वार्ड त्वरीत सुरू करा. नाना काटे यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
राजधानी मुंबईत गोवरने धुमाकूळ घालीत अनेक बालकांचे बळी घेतले आहेत.आता हा आजार पिंपरी चिंचवड शहरात पसरण्याची दाट शक्यता आहे.शहरात या साथीचे पाच रुग्ण आढळले असून सात संशयित आहेत.गोवर या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधात्मक योग्य उपाययोजना करणेबाबत तसेच शहरात स्वतंत्र गोवर आयसोलेषण सेंटर उभारण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते,माजी नगरसेवक व विरोधी पक्ष नेते,मनपा पिंपरी चिंचवड विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी आयुक्त शेखर सिंह यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.


आपल्या संपूर्ण पिपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसामध्ये लहान बालकांमध्ये गोवर या संसर्गजन्य रोगाची लक्षणे वाढताना दिसत आहेत, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे, त्या पार्श्वभूमीवर आपल्या शहरामध्ये देखील खबरदारी घेणे गरजेचे आहे, त्यासाठी सध्या महापालिकेतर्फे लोकवस्तीमध्ये करण्यात येत असलेले सर्वेक्षणाचे कामास गती दिली पाहिजे, तसेच यावर लागणाऱ्या औषध साठा, वैद्यकीय साहित्य शहरातील महापालिकेच्या सर्व रुग्णालयामध्ये योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच गोवर हा संसर्गजन्य रोगाचा प्रकार असून त्याचा प्रसार फार वेगाने होत आहे, आपल्या शहरातील महानगरपालिकेच्या वायसीएम रुग्णालय, व इतर रुग्णालयामध्ये विविध आजारावरती शहरातील व परिसरातील नागरिक उपचार घेत असून त्यामुळे सर्व रुग्ण एकाच जागी येत असल्याने गोवर हा संसर्गजन्य रोग असल्याने या बाधित रुग्णाच्या संपर्कात इतर रुग्ण आल्यास या आजाराचा प्रादुर्भाव वाढेल म्हणून त्यावर खबरदारीची उपाययोजना म्हणून पिंपरी चिंचवड शहरात गोवर आयसोलेषण सेंटर उभारण्यात यावे, जेणेकरून गोवर या आजाराबाबत होणार्या सर्व तपासण्या या एकाजागी होतील व शहरातील इतर आजारावर्ती उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा त्रास होणार नाही व गोवर नियंत्रणात येण्यास मदत होईल. तरी मा. आयुक्त साहेब गोवर या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहता या रोगावर प्रतिबंधात्मक योग्य उपाययोजना व खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित मनपा वैद्यकीय विभागाला करण्यात याव्या व शहरात या रोगावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र गोवर आयसोलेशन सेंटर उभारण्यात यावे.असे नाना काटे यांनी म्हटले आहे.

Lic

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय