Monday, July 15, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडदफनभूमीच्या लढ्यासाठी एकवटला जनसागर; सर्व मुस्लिम धार्मिक संघटनांची एकी !

दफनभूमीच्या लढ्यासाठी एकवटला जनसागर; सर्व मुस्लिम धार्मिक संघटनांची एकी !

संभाजी ब्रिगेड, पँथर आर्मी सह अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला ८ दिवसांचा अल्टिमेटम  

पिंपरी चिंचवड : थेरगाव, काळेवाडी परिसरातील दफनभूमीच्या मागणीसाठी मागील २० वर्षांपासून परिसरातील अनेक कार्यकर्ते व सामाजिक संस्था च्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेशी पत्रव्यवहार व पाठपुरावा चालू आहे. परंतु याबाबत पालिका प्रशासन व लोप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मुस्लिम समाजाला दफनभूमी मिळू शकली नाही. त्यामुळे कब्रस्तान संघर्ष समिती च्या वतीने थेरगाव, काळेवाड, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, जगताप डेअरी, वाकड, डांगेचौक हा सर्व परिसर पिंजून काढत मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या. 

यामध्ये आलमगीर मस्जिद, अन्सार मस्जिद, हुजेफा मस्जिद, रहमानीया मस्जिद, मक्का मस्जिद, जामा मस्जिद, सुबानिया मस्जिद, गुलशन ए रजा मस्जिद या सर्व मस्जिदमधील प्रमुख व परिसरातील नागरिक व युवकांची काळेवाडी येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये शेकडोंचा संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या ठिकाणी मुस्लिम समाजातील सर्व धार्मिक व सामाजिक संघटना एकत्रित आल्या होत्या. यावेळी हाजी गुलजार, मौलाना अलीम अन्सारी, कारी इकबाल, गुलामभाई शेख  यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करीत प्रशासनाचा निषेध केला.

कब्रस्तान संघर्ष समितीच्या वतीने बोलताना सिद्दिक शेख यांनी सांगितले कि, मुंबई महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील कलम ३२० च्य तरतुदीनुसार दफनभूमी साठी जागा उपलब्ध करून देणे व कलम ३२१ नुसार शहर विकास आराखड्यामध्ये मुस्लिम दफनभूमीसाठी जागा आरक्षित करण्याचे नमूद आहे. परंतु तरीसुद्धा मागील २० वर्षांपासून वारंवार पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही पालिका प्रशासनच्या वतीने दफनभूमीसाठी जागा न दिल्याने समाजातील नागरिकांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन पालिका प्रशासन करीत आहे.

यामुळे नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी सिद्दिक शेख यांनी ६ डिसेंबर २०२१ रोजी आयुक्त राजेश पाटील याना दफनभूमीबाबत दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा तसे न झाल्यास येत्या ८ दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेवर कायदेशीर व संविधानिक मार्गाने हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात येईल.

दफनभूमीच्या या आंदोलनास शहरातील संभाजी ब्रिगेड, पँथर आर्मी यांसह अनेक सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून, या आंदोलनामध्ये सर्वधर्मीय नागरिकांचा सहभाग असलयाने हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार आहे. 

– क्रांतिकुमार कडुलकर 


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय