Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक सहल उत्साहात संपन्न 

PCMC : चिंचवड येथील ज्येष्ठ नागरिकांची वार्षिक सहल उत्साहात संपन्न 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : महात्मा फुलेनगर, चिंचवड येथील ओम शांती ज्येष्ठ नागरिक संघाने कोकणातील गणपतीपुळे व पावस येथे वार्षिक सहलीचे नुकतेच आयोजन केले होते. ४३ ज्येष्ठ नागरिकांनी या सहलीचा आनंद लुटला.

संघाचे अध्यक्ष यशवंत कण्हेरे व सहकार्यांनी सहलीचे आयोजन केले होते. पर्यावरणाचे रक्षण करावे, झाडा पानात रमावे हिरव्या रानाचा आनंद रिमझिम पडणाऱ्या पावसात घ्यावा, म्हणून हे ज्येष्ठ नागरिक या रम्य निसर्गात एकत्र आले होते. शहरी जीवनापासून दूर विरंगुळ्यासाठी ज्येष्ठांना अलीकडे घरातून सहसा जाता येत नाही. त्यामुले त्यांनाही एक दिवस पावसात भिजण्याचा व स्वत:मध्ये रमण्याचा आनंद मिळावा म्हणून ही आगळी वेगळी सहल काढण्यात आली, असे कण्हेरे यांनी सांगितले.

आपली दुखणी व आजार विसरून ज्येष्ठांनी ही सहल संस्मरणीय केली, असे यशवंत कण्हेरे म्हणाले. संपूर्ण दिवस वयोवृध्दांनी या गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर नाच – गाण्यांपासून चर्चा गप्पा व एकमेकांशी संवाद असे कार्यक्रम केले. या ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुनंदा मुंडे, सचिव दिनेश पाटील, खजिनदार मधुकर धकाते, सल्लागार शिवानंद चौगुले, विश्वास सोहोनी व इतरांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय