Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपवना थेट पाईपलाईन’मुळे शहराची चिंता मिटणार – नाना काटे 

पवना थेट पाईपलाईन’मुळे शहराची चिंता मिटणार – नाना काटे 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर :

पिंपरी-चिंचवड शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा मावळ तालुक्यातील पवना धरणातून थेट पाईपलाईन द्वारे पाणी शहरात आणले जाणार आहे. यापूर्वी पवना थेट पाईपलाईन प्रकल्पावर स्थगिती होती. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड शहरात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत समविचारी पक्ष एकत्रित असल्याने तातडीने निर्णय करण्याची मागणी केली. त्याला यश आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड शहरात पवना धरणातून थेट पाईपलाईन द्वारे पाणी मिळणार आहे. शहराची लोकसंख्या पाहता पाणी प्रश्न मिटणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केले आहे.
Due to direct pipeline to Pavana, the city’s worries will be solved ​​Nana Kate

मावळ तालुक्यातील शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील वादामुळे २०११ मध्ये पवना थेट पाईपलाईन प्रकल्पाला तत्कालीन राज्य सरकारने ‘जैसे थे’ स्थगितीचे आदेश दिले होते. पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या तीस लाखाच्या घरात जात असताना शहराला मागील काही वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरातील नागरिक पाणीटंचाईने त्रस्त असताना एकीकडे गेल्या १२ वर्षांपासून पवना बंदिस्त जलवाहिनीतून पाणीपुरवठा प्रश्न प्रलंबित होता. यावरील स्थगिती उठवल्याने प्रकल्पाला चालना मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या समविचारी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतल्याने पिंपरी चिंचवड करांच्या वतीने समाधान व्यक्त केले आहे.

काटे म्हणाले की, राज्य सरकारमध्ये महायुती सरकार आहे. या प्रकल्पाला शिवसेना भाजप व त्या वेळचे सत्यता असणारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारात तफावत झालेल्या या प्रकल्पाला अनेक वर्षापासून मूर्त स्वरूप आले होते. मात्र हेच तिन्ही पक्ष सध्या राज्यातील सत्तेत असल्याने समविचाराने पवना थेट पाईपलाईन प्रकल्पासाठी सकारात्मक भूमिका घेतली. पिंपरी चिंचवड शहरातील उपनगरात वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण आणि भविष्यातील शहराची गरज लक्षात घेता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश रद्द करावा, महापालिका प्रशासनाने मागणी केली त्याला यश मिळाले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्या विशेष प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड शहराची पाणीटंचाई सुटण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याने त्यांचे आभार पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय