वॉश्गिंटन : सध्या इस्त्रायल-हिजबुल्लाह, इस्त्रायल-इराण असा तीव्र संघर्ष सुरू आहे. दरम्यान पंतप्रधान बेंजामिन नेत्यांनाहू यांच्या घरावर हिजबुल्लहने रॉकेट डागली होती. आणि इस्त्रायलवर दररोज रॉकेट हल्ले होत आहेत. अद्यापही कूटनितिक आणि राजकीय समझोता होऊ न शकल्यामुळे मध्यपूर्वेतील हे भीषण युद्ध थांबत नाही. (THAAD)
दरम्यान रशियाने इस्त्रायलने इराणावर हल्ला करण्याचे धाडस करू नये अशी धमकी दिली आहे. दरम्यान या धमकीनंतर आता अमेरिका इस्त्रायलला लष्करी मदत करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेने इस्त्रायलला धोकादायक क्षस्त्रे पाठवली आहेत. (THAAD)
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने आपली प्रगत अँटी-बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्त्रायच्या संरक्षणासाठी दिली आहेत. तर याच वेळी इराणने अमेरिकेला या युद्धात इस्रायलला पाठिंबा देऊ नये असा कडक इशारा दिला आहे.
त्यामुळे इस्रायलच्या रक्षणासाठी अमेरिकेने टर्मिनल हाय ऑल्टिट्यूड एरिया डिफेन्स (Terminal High-Altitude Area Defence (Thaad) थाड डिफेन्स सिस्टीम इसर्यल मध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. (THAAD)
इराणच्या संभाव्य बॅलिस्टिक मिसाईल हल्ल्यांपासून इस्रायलचे हवाई संरक्षण करण्यासाठी अमेरिकेने थाड क्षेपणास्त्र हल्ला विरोधी अती प्रगत सिस्टीम तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.