Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडचंद्रकला किशोरीलाल गोयल महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

चंद्रकला किशोरीलाल गोयल महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

पुणे : दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला व वाणिज्य महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना अध्यापन अनुभव देऊन शिक्षकांची भूमिका साकारण्यात लावून वैविध्यपूर्ण पद्धतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

सकाळी ७:२० ते ९:३० या वेळेत विद्यार्थी शिक्षक भूमिका साकारणाऱ्या शिक्षकांनी वेगवेगळ्या वर्गावर विविध विषयांचे अध्यापन केले. अध्यापन करताना शैक्षणिक साधनांचा वापर विद्यार्थ्यांनी केला आणि अतिशय प्रभावीपणे अध्यापन केले. वर्गात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आजच्या विद्यार्थी शिक्षकांना खूप छान प्रतिसाद दिला. महाविद्यालयात अध्यापनाला सुरुवात करण्यापूर्वी सामूहिक पद्धतीने राष्ट्रगीत घेण्यात आले. व त्यानंतर अध्यापन सुरुवात झाली.

विद्यार्थी शिक्षक म्हणून भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्राचार्य, उपप्राचार्य होण्याची संधी दोन विद्यार्थ्यांना मिळाली व बाकीच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापक म्हणून भूमिका निभावली. एकूण वीस विद्यार्थी शिक्षकांनी यामध्ये भाग घेतला. प्रत्येकाने वीस मिनिटांचा एक तास या पद्धतीन वेळापत्रक नेमून दिलेल्या वर्गांवर तास घेतले.

महाविद्यालय चालवण्याची सर्व जबाबदारी विद्यार्थ्यांवर देण्यात आली होती. व सर्व कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमपणे करून प्राचार्य, उप-प्राचार्य, प्राध्यापक म्हणून दिलेली भूमिका अतिशय व्यवस्थित पद्धतीने पार पडली. या अनुभवातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाला मोठी संधी प्राप्त झाली. वर्ग अध्यापन नंतर ठीक १०:०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात सामूहिक पणे ‘शिक्षक दिन’ कार्यक्रम संपन्न झाला.

या एकत्रित कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, महाविद्यालयाचे नियमित प्राध्यापक आणि आज शिक्षक दिनानिमित्त प्राध्यापक म्हणून भूमिका साकार करणारे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते. सामूहिक शिक्षक दिन कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर विद्यापीठ गीत घेण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी यांनी आजच्या शिक्षक दिन कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थी- शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तर आजच्या विद्यार्थी शिक्षकांच्या वतीने वतीने महाविद्यालयातील गुरुजन प्राध्यापक वर्गांचा सन्मान गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. विद्यार्थी शिक्षकांच्या वतीने आजच्या प्राचार्या पूनम यादव, उप-प्राचार्य गोडबोले रोहित, विद्यार्थी शिक्षक औरादकर सुभाष यांनी आपले अनुभव व मनोगत व्यक्त केली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी, प्रा.डॉ. बाळासाहेब माशेरे, प्रा. पठारे प्रितिश, डॉ. बच्चव प्रियंका, प्रा. डॉ. नागनाथ माने, प्रा. बाबळे अनिता यानी कार्यक्रमांमध्ये आपली मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमांमध्ये प्रा. डॉ‌.प्रियंका बच्चव यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

आजच्या शिक्षक दिन कार्यक्रमांमध्ये प्राचार्य म्हणून यादव पूनम, उप-प्राचार्य म्हणून गोडबोले रोहित, प्राध्यापक म्हणून पानसरे निकिता, ढलोड जानवी, पिल्ले नंदिनी, शेख आफ्रीन, शिंदे एकता, देशमुख नंदिनी, गायकवाड दीक्षा, शेळगेअंजली, मोरे रत्नप्रभा, म्हेत्रे भूमिका, आगलावे कीर्ती, मोरे जयराम, औरादकर सुभाष, गावडे मंदार, इंगळे मयुरी, मस्के भावना, यांनी भूमिका पार पाडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिंदे एकता यांनी केले. आभार कु. म्हेत्रे भूमिका यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ.बाळासाहेब माशेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापकांनी केले. कार्यक्रमाची सांगता :’वंदे- मातरम!’ गीताने झाली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय