Saturday, May 18, 2024
Homeराज्यमंत्रिमंडळाने विनाअनुदानित शाळेच्या वेतन अनुदानासाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा; अन्यथा १७ जूनपासून...

मंत्रिमंडळाने विनाअनुदानित शाळेच्या वेतन अनुदानासाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा; अन्यथा १७ जूनपासून मंत्री व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलनाचा कृती समितीचा इशारा.

प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने विनाअनुदानित शाळेच्या वेतन अनुदानासाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा अन्यथा १७ जूनपासून मंत्री व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने दिला आहे.

             कृती समितीने लॉकडाऊन लागण्याआधी पुणे ते मुंबई पायी वारीची दखल घेत शिक्षणमंत्र्यांनी आश्वासन दिले होते की आपल्या मागण्या लगेचच पूर्ण केल्या जातील. नंतर लॉकडाऊन लागले हे कारण सांगण्यात आलेले आपणही सतत पत्र व्यवहार करुन संयम पाळला.पण आता लॉकडाऊन जवळपास संपत आला, असतानाच शासनाची आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याचे कारण पूढे करुन शासन वेळ काढूपणा करत आहे हे आता स्पष्ट दिसत आहे. म्हणूनच कृती समिती आता आंदोलन करण्याच्या भूमिकेत आहे.

      शेकडो कुटुंब उध्वस्त झालेत आणि हजारो शिक्षकांचे कुटुंब उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षक बांधवांची आपल्या प्रत्येकाची परिस्थिती आता सांगण्याच्याही पलीकडे गेली आहे . अशावेळी नव्याने आलेले शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहील या अपेक्षा आता फोल ठरताना दिसत आहे, खंडेराव जगदाळे यांनी म्हटले आहे.

             १५ जून पूर्वी सर्व वेतन अनुदानाचा आदेश न निघाल्यास व विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या सर्व मागण्यांंवर ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन करण्यात येणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय