Monday, May 20, 2024
Homeआरोग्यराज्यातील केस कर्तनालये सुरू करा; लॉकडाऊन काळात १० हजार अनुदान देण्याची सिटू'ची...

राज्यातील केस कर्तनालये सुरू करा; लॉकडाऊन काळात १० हजार अनुदान देण्याची सिटू’ची मागणी.

प्रतिनिधी :- राज्यातील केस कर्तनालये सुरू करा आणि  लॉकडाऊन काळात १० हजार अनुदान देण्याची  सेंटर ऑफ ट्रेंड युनियन(सिटू)च्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.

       २४ मार्च २०२० पासून राज्यातील अनेक उद्योग-व्यवसाय बरोबरच केशकर्तनालय (सलून) बंद करण्यात आले आहेत. राज्यांमध्ये सलून मध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या लाखापेक्षा जास्त आहे. गेले तीन महिने व्यवसाय बंद असल्यामुळे सलून मध्ये काम करणारे कारागीरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 

         तसेच त्यांना कुठलीही आर्थिक मदत केंद्र किंवा राज्य सरकारने केलेली नाही. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांचीही केस कापणे बाबत मोठी अडचण झाली आहे. आता सरकारने लॉक डाऊन मध्ये टप्प्याटप्प्याने शिथीलता देण्यास सुरुवात केली आहे. तरी आपण सलून व्यवसायिकांना त्यांचे कामकाज सुरू करण्यासाठी अटी-शर्ती घालून परवानगी द्यावी, अशी मागणी सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड व राज्य सरचिटणीस एम.एच.शेख यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय