Monday, May 20, 2024
Homeग्रामीण२ हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात; 'एसीबी'ची कारवाई.

२ हजाराची लाच घेताना तलाठी जाळ्यात; ‘एसीबी’ची कारवाई.

कोल्हापूर(प्रतिनिधी) :- कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी या गावातील तलाठी २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला.

             तक्रारदाराने मे २०२० मध्ये हुपरी गावातील त्याच्या गटक्रमांक १८७६ मधील शेतामध्ये बोरवेल मारली आहे. याची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी  आरोपी तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने (वय ५४, रा. प्लॉट क्र. ५४ संभाजीपूर अण्णासाहेब चकोते शाळेसमोर) याच्याकडे १६ जून रोजी अर्ज दिला होता तेव्हा तक्रारदार कोतवाल मुदाळे यांना भेटले असता तलाठी शेरखाने बोरवेलची नोंद घेण्यासाठी ३ हजार रुपये मागत आहेत. पैसे दिल्याशिवाय ते तुमच्या बोरवेलची नोंद सातबाऱ्यावर करणार नाहीत. तेव्हा तुम्ही त्यांना जाऊन भेटा असे सांगितले. त्याबाबत तक्रारदारने तलाठी शेरखाने विरुध्द तक्रार अर्ज दिला होता.  

            त्यानुसार हुपरी तलाठी कार्यालयामध्ये शासकीय पंच साक्षीदाराच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता पडताळणीमध्ये शेरखाने याने तडजोडीअंती २ हजार रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. लावलेल्या सापळ्यात २ हजार रक्कम स्वीकारताना तलाठी शेरखाने रंगेहात सापडला. 

             हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, हवलदार मनोज खोत, जवान शदर पोरे, नवनाथ कदम, सुनील घोसाळकर यांच्या पथकाने केली.   

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय