Monday, May 20, 2024
Homeग्रामीणएसीबीची कारवाई; २५ हजाराची लाच घेताना सीपीआरमधील वाहनचालक सापडला.

एसीबीची कारवाई; २५ हजाराची लाच घेताना सीपीआरमधील वाहनचालक सापडला.

कोल्हापूर(प्रतिनिधी) :- प्रथम कंत्राटी पध्दतीवर व त्यानंतर कायमस्वरुपी कामावर आदेश काढून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सीपीआरमधील वाहनचालक राहूल प्रल्हाद बट्टेवार यास लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले. 

           लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना संसंर्गाच्या दृष्टिने सीपीआरमध्ये वॉर्ड बॉयची प्रथम कंत्राटी पध्दतीने कर्मचारी भरती होणार आहे. काही दिवसानंतर त्यांना कायमस्वरुपी कामावर हजर करुन घेणार असल्याबाबत आरोपी लिपीक बट्टेवार (व. ४५, रा. ५९४ पंचरत्न कॉलनी, ठोबरे मळा कसबा बावडा) यांने तक्रारदाराला सांगितले होते.                

          तक्रारदाराने त्याला व त्याच्या भावास वॉर्ड बॉय म्हणून कामावर हजर करुन घेण्याबाबत सांगितले. बट्टेवार याने तक्रारदार आणि त्याच्या भावाला वॉर्ड बॉय म्हणून कंत्राटी पध्दतीने कामावर हजर करुन घेण्यासाठी रितसर अर्ज स्वत: हा भरतो असे सांगून दोघांच्या आधारकार्डची झेरॉक्स व छायाचित्रे घेवून येण्यास सांगितले.

            प्रथम कंत्राटी पध्दतीने सीपीआर येथे वॉर्ड बॉय म्हणून वरिष्ठांना सांगून घेणार त्यानंतर कायमस्वरुपी कामावर घेण्याचा आदेश वरिष्ठ कार्यालय मुंबई आरोग्य विभागामधून काढून देण्यासाठी ५ लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर आदेश देणार नाही, असे बट्टेवार यांने तक्रारदाराला सांगितले. यानंतर केलेल्या लाचेच्या मागणीची तक्रार तक्रारदाराने १७ जून रोजी लाच- लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. याच दिवशी पंच साक्षीदारांच्या समक्ष लाच मागणीची पडताळणी केली असता त्यामध्ये ५ लाख रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. 

                  पुन्हा बट्टेवार याच्या लाच मागणीबाबत पडताळणी केली असता त्याने तक्रारदारकडून ५ लाखाची मागणी करुन पहिला हप्ता २५ हजार रुपयांचा स्वीकारण्याचे मान्य केले. उर्वरित रक्कम एकरकमी देण्यास सांगितले. २५ हजार रुपये लगेच घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लावलेल्या सापळ्यात वाहनचालक बट्टेवार २५ हजार रुपये स्वीकारल्याने त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे, जवान संदिप पडवळ, रुपेश माने, मयुर देसाई आदींच्या पथकाने केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय