Friday, May 17, 2024
Homeराज्यआशा व गटप्रवर्तक संप काळातील मागण्या मान्य  बाबत त्वरित शासन निर्णय काढा...

आशा व गटप्रवर्तक संप काळातील मागण्या मान्य  बाबत त्वरित शासन निर्णय काढा – आयटक चा १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे भव्य मोर्चा 

नाशिक : आरोग्य विभागात कार्यरत गटप्रवर्तक व आशा चा राज्यव्यापी बेमुदत संप २१ दिवस चालला. शासनाने काही मागण्या मान्य केल्या. मात्र त्या संदर्भात शासन निर्णय काढलेला नाही. तो त्वरित  काढण्यात यावा. व अमलबजावणी करावी. यासाठी राज्यव्यापी गट प्रवर्तक आशा मोर्चा आयटक वतीने १८ डिसेंबर २०२३ रोजी ११ वा. चाचा नेहरु बाल भवन, शुक्रवारी तलाव, नागपूर येथून निघणार आहे. तरी शासनाने खालील मागण्या मान्य

कराव्यात अशी मागणी आयटक वतीने आशा गट प्रवर्तक संघटना महाराष्ट्र करत असल्याचे आयटक चे नेते कॉम्रेड राजू देसले यांनी सांगितले.

आंदोलनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे : 

१) आरोग्य मंत्री महोदय यांनी संप काळात आशा ना दरमहा ७ हजार रूपये व गटप्रवर्तकांना १० हजार रूपये मोबदला वाढ करण्याचे लेखी पत्र दिले आहे. त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. शासन निर्णय त्वरित काढण्यात यावा.  तसेच राज्य सरकारने केंद्र सरकारकडे गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा बाबत प्रस्ताव पाठून पाठपुरावा करेल. आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी केंद्र सरकारकडे पत्र पाठवले आहे. त्यावर त्वरित निर्णय घेण्यात यावा. व कंत्राटी कर्मचारी दर्जा गटप्रवर्तक देण्यात यावा. तसेच २ हजार रूपये दिपावली बोनस भेट त्वरीत खात्यात जमा करावी.

२) आशा स्वयंसेविकांना ऑनलाईन कामे सांगण्या येतं आहे. मात्र आशा अल्पशिक्षित आहेत. ग्रामीण आदिवासी बहुल तसेच अतिदुर्मम भागात मोबाईल ला रेंज सुद्धा उपलब्ध होत नाहीं. तसेच साधे मोबाईल आहेत. पुरेसे प्रशिक्षण सुद्धा देण्यात आलेले नाही. तरी सुद्धा सक्ती करुन दबाव आणत आँनलाईन काम करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे आशा वर मानसिक ताण निर्माण होत आहे. तरी आँनलाईन कामाच्या अडचणी अधिकारी वर्गाने स्थानिक पातळीवर दूर करण्यासाठीं प्रयत्न करावेत यासाठी शासनाने आदेश द्यावेत. सक्ती केली जाऊ नये. जे एस वाय चा लाभ  सरसकट आशा ना दया, आरोग्य वर्धीनी चा लाभ  गट प्रवर्तक ना द्या. 

३) केन्द्र सरकारने २०१८ पासून आशा व गटप्रवर्तकांना मोबदला वाढ दिलेली नाही. ती त्वरीत द्यावी. किमान वेतन लागू करा.

४) गटप्रवर्तकांचे नाव बदलून ‘सुपरवायझर’ करा.

५) आशा व गटप्रवर्तकांना किमान वेतन लागू करा. सामाजिक सुरक्षा लागू करा. प्रसूती पगारी रजा, किरकोळ रजा, पेन्शन लागू करा. 

राज्यभरातील ७८ हजार आशा व ३ हजार ६०० गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना (आयटक) चे राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले, राष्ट्रीय अध्यक्षा मंगला पांडे, सरचिटणीस सुमन पूजारी, उपाध्यक्ष कॉ. वैशाली खंदारे, विनोद झोडगे, प्रफुल्ल देशमुख, शालुताई कुथे, मंदा डोंगरे, दिवाकर नागपुरे, शबाना पठाण आदींनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय