Saturday, May 18, 2024
Homeग्रामीणओरीएंटल आणि एस.एस.कंसट्रकशन कंपनी वर कार्यवाही करा, आम आदमी पार्टीची मागणी

ओरीएंटल आणि एस.एस.कंसट्रकशन कंपनी वर कार्यवाही करा, आम आदमी पार्टीची मागणी

कामगारांचे तीन दिवसापासून आमरण उपोषण

नागपूर : कंत्राटी पद्धत नियमन व निर्मुलन प्रमाणे कामगारांना नियमित करण्यासाठी केंद्रीय कामगार विभागाकडून कंपनीवर योग्य ती कार्यवाही होणे अपेक्षित होते. परंतु कोणत्याही प्रकारची उचित कार्यवाही केल्याचे दिसून येत नसल्यामुळे अन्यायग्रस्त महिला गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणवर बसल्या आहेत. या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप कामगारांकडून केला जात आहे.

कॉन्ट्रेक्टर कोणत्याही मजूरांचे पगार नियमित देत नाही, त्यांचा प्रोविडेंट फंड कपात करून भरत नाही, कामगारांचे रिकॉर्ड बरोबर ठेवत नाही. नियमाप्रमाणे कोणतेही रजिस्टर न ठेवता सरकारी यंत्रणेच्या सह्याने गैरव्यवहार चालू आहे.

नागपूर विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी द्वारे या प्रकरणा मध्ये कार्यवाही करून उपोषण मागे घेण्याचे पत्र केंद्रीय कामगार आयुक्त यांना आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आले.

या आंदोलनात नागपुर स्लम संघटना समन्वयक सचिन लोनकर यांनी पुढाकार घेवून उपोषनाला बसलेल्या कामगारांची मदत केली. निवेदन देतवेळी आप चे राज्य कोषाध्यक्ष जगजीत सिंघ, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, कविता सिंघल, नागपुर सचिव भूषण ढाकूलकर, सुरेन्द्र बरगडे, मोरेश्वर मौनदेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय