Thursday, May 2, 2024
Homeग्रामीणसुरगाणा मुख्य चौकात किसान सभेचा मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन;मा.आमदार...

सुरगाणा मुख्य चौकात किसान सभेचा मोर्चा. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आंदोलन;मा.आमदार जे पी गावित

 

नाशिक प्रतिनिधी:

कळवण सुरगाणा चे माजी आमदार जे पी गावित यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी,विद्यार्थी आणि युवकाच्या मागण्या घेऊन किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी युवक व विद्यार्थी सहभागी होते. हे आंदोलन कोविड-19 चे नियम पाळून करण्यात आले.आंदोलकांनी मास्क लावून व शारीरिक अंतर पाळून आंदोलनात सहभाग घेतला.

     या आंदोलनात मनमानी कारभार करण्याऱ्या अधिकारी विरोधात आवाज उठवला होता.या अधिकाऱ्यानं विरोधात कडक कारवाई व्हावी म्हणून मागणी केली.त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न वनजमीन ३० सप्टेंबर पर्यत सर्व दावे निकाली काढण्याचे आदेश दिले आहेत.त्याचबरोबर युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी.रोजगारासाठी गावातच रोजगार हमीचे कामे सुरू करण्यात यावी.अति पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे त्यामुळे दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांना त्वरित मदत घ्यावी. त्याचरोबर कोविड-19 च्या काळात शिक्षण घेता येत नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात याव त्यासाठी तालुक्यातील बंद असलेले सर्व मोबाइल टॉवर सुरू करण्यात यावे. कुणालापन नेटवर्क ची अडचण येणार नाही.

   या सर्व मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात यईल असे मा. आमदार जे पी गावित यांनी सांगितले.या आंदोलनला SFI आणि DYFI संघटनेने पाठिबा दिला.या आंदोलनाला इंद्रजित गावित, सुभाष चौधरी, मेनका पवार,सावळीराम पवार,भारती चौधरी आदी शेतकरी बांधव उपस्तीत होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय