Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha) एक महात्वाची बातमी येत आहे. काही वेळापुर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने आपली लोकसभेची यादी जाहीर केली. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाकडून देखील बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवले आहे.
पवार कुटूंबासाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाने सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये विद्यामान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार या उमेदवार असणार आहे. ही उमेदवारी घोषित झाल्याने बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत बघायला मिळणार आहे.
काही वेळा पुर्वीच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये वर्ध्यात नुकतेच काँग्रेसमधून शरद पवार गटात आलेले अमर काळे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरुरमधून डॉ.अमोल कोल्हे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, तसेच नगर दक्षिणमधून अजित पवार गटातून आलेले निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मध्ये ‘योग्य’ उमेदवार दिला जाईल. त्याला निवडून आणा. तुमच्या भागाचा सर्वांगिण विकास केला जाईल, याची खात्री देतो, असे पवार यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात 9 शेळ्यांचा मृत्यू
ब्रेकिंग : व्हाट्सॲपवर निवडणूकीचा प्रचार करणाऱ्यावर मोठी कारवाई
मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या भूमिकेचं डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं स्वागत!
मध्यरात्री शेकडो विद्यार्थिनींचे कुलगुरूंच्या बंगल्यासमोर 2 तास ठिय्या आंदोलन
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील पाच मतदारसंघात एकूण १८१ पैकी ११० उमेदवारांचे अर्ज वैध
अभिनेता गोविंदा यांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ पक्षात केला प्रवेश
मोठी बातमी : दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, खुब्याला मार तर हाथ फ्रॅक्चर