Tuesday, May 7, 2024
Homeराज्यमोठी बातमी : ‘रोहयो’ मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर...

मोठी बातमी : ‘रोहयो’ मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई : रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या सेवा आकृतीबंध नियोजनात घेऊन सेवा कायम करण्‍याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.

विधानभवन येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत जिल्हा समन्वयक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी व लिपीक अथवा डाटा एंट्री ऑपरेटर, कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा आकृतीबंध नियोजनात घेऊन त्यांच्या सेवा कायम करण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, रोहयोचे उपसचिव दादासाहेब खटाळ, मग्रारोहयो कृती समितीचे अध्यक्ष विवेक तायडे, उपाध्यक्ष संदीप झाडोकार, कोषाध्यक्ष मनोज ठाकूर, अंबिकेत गडकर, सतीश वाढई, गौतम  अजिंक्य साखरे, तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कर्मचारी दहा वर्षे होऊन सुध्दा कमी मानधनावर काम करीत आहेत. विविध माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत ग्राम पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत कर्मचारी कर्तव्य पार पाडत आहेत. योजनेत मानधन व इतर सेवा देण्यात येतात. यासाठी रोहयोमध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध नियोजन करून सेवा कायम करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय