Friday, November 22, 2024
Homeजिल्हास्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या "अखिल भारतीय जथ्याचे" सावित्रीबाई फुले पुणे...

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या “अखिल भारतीय जथ्याचे” सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जोरदार स्वागत

युजीसी बंद करण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र – दिप्सिता धर

पुणे : नवीन शैक्षणिक धोरण शिक्षणाचे बाजारीकरण करणारे असून बहुसंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याबरोबरच विद्यापीठ अनुदान आयोग रद्द करण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे, अशी टिका जेएनयू विद्यार्थी नेत्या व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय सहसचिव दिप्सिता धर यांनी केली.

शिक्षण वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा या संकल्पनेला घेऊन देशभरात स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) या विद्यार्थी संघटनेच्या वतीने “अखिल भारतीय जथ्याचे” आयोजन केले आहे. या जथ्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज जोरदार स्वागत करण्यात आले. या जथ्याचे नेतृत्व एसएफआयच्या राष्ट्रीय सहसचिव तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली (JNU) मध्ये PhD चे शिक्षण घेत असलेल्या दिप्सिता धर या करत असून शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे जिल्ह्यात गुरूवारी या जथ्याचे आगमन झाले. यावेळी विद्यापीठ मेन गेट ते संविधान स्तंभ अशी रॅली काढण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठ मुख्य इमारत येथे झालेल्या जाहीर सभेस संबोधित करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा अध्यक्ष अविनाश गवारी होते.

यावेळी मंचावर एसएफआय राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सहसचिव नितीन वाव्हळे, मलेशम कारमपुरी, छत्तीसगड राज्य निमंत्रक अर्चना धुर्व, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, विलास साबळे, जन आरोग्य मंच चे डॉ. ज्ञानेश्वर मोटे, गणेश दराडे उपस्थित होते.

यावेळी जन आरोग्य मंच चे डॉ. ज्ञानेश्वर मोटे, गणेश दराडे, विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी तुकाराम शिंदे, युक्रांदचे कमलाकर शेटे, दलित पँथरचे राहुल ससाणे, विद्यार्थी ओम यांनी आपले मनोगत व्यक्त करत जत्थाला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय निर्मळ यांनी केले.

यावेळी राजू शेळके, रूपाली खामसे, बाळकृष्ण गवारी, पल्लवी बोराडकर, दिपक वाळकोली, मोसीन बनकर, अभिषेक शिंदे, नितिन हालुंगडे, सौरभ सोनवणे, रामेश्वर आठवले, भार्गवी लाटकर, अक्षय घोडे, अक्षय साबळे, योगेश हिले, गणेश जानकर आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय