पुणे (राजेंद्रकुमार शेळके) : मुळशी तालुक्यातील पिरंगुट जय वाघजाई देवी शैक्षणिक संकुलातील संस्कार इंग्लिश मिडीयम स्कूल येथील इयत्ता १० वी परीक्षा मार्च २०२४ मध्ये मुलांनी मिळवलेल्या भरगोस यशाबद्दल त्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. (School)
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे म्हणाल्या, “ही यशाची पहिली पायरी आहे म्हणून खूप पायऱ्या आपल्याला गाठायच्या आहेत त्यामुळे प्रामाणिक कष्ट करा, मेहनत करा व आपल्या यशाचा मार्ग स्वतः तयार करा. आयुष्यात आपल्याला ज्यांनी ज्यांनी योग्य मार्गदर्शन केलं त्यांना कधीही विसरू नका. आपले आई वडील शिक्षक यांचा कायम आदर करा. खूप चांगल्या गोष्टी शिकण्यासारखे आहेत त्यामुळे आपले डोळे, कान, डोके व्यवस्थित उघडे ठेवून ज्ञान आत्मसात करा व त्याचा वापर आपल्या आयुष्यात चांगले बनवण्यासाठी करा. (School)
विद्यार्थ्यांसह पालकांचेही मॅडमने अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा साठे, इयत्ता दहावीला शिकवलेले विषयनिहाय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
आंतरराष्ट्रीय योग दिवस : प्राचीन ज्ञानाचा आधुनिक जगाला वारसा
BSF : सीमा सुरक्षा दलात 10वी/12वी उत्तीर्णांसाठी भरती; पगार 81000 पर्यंत