औरंगाबाद:-औरंगाबाद शहरात सध्या सुरु असलेल्या जनता संचारबंदीत, रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या ३३४ जणांकडून काल ८१ हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसंच अशा १९० जणांविरुद्ध कारवाईसह त्यांची वाहनं जप्त करण्यात आली. तर, २५ जणांवर गुन्हे दाखल झाले.
१० ते १८ जुलै दरम्यान लागू असलेल्या या संचारबंदीचा काल तिसरा दिवस होता. शहरवासियांच्या सहकार्य आणि सतर्कतेमुळं कालही सर्व ठिकाणी याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. महापालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय यांनी काल स्वत: शहरात प्रत्यक्ष पाहणी करत प्रशासकीय बंदोबस्ताचा आढावा घेतला. तसंच, प्रमुख नाक्यांची पाहणीही केली.
शहरात काल संचारबंदीदरम्यान विनाकारण फिरणाऱ्या १९० वाहनधारकांची वाहनं ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली.