Sunday, December 8, 2024
Homeजिल्हानवापूर तहसीलदार यांना बिरसा क्रांती दलाचे निवेदन

नवापूर तहसीलदार यांना बिरसा क्रांती दलाचे निवेदन

राजेंद्र भारूड समर्थनार्थ व हिना गावीत यांच्या निषेधार्थ निवेदन

 

नवापूर : डाॅ.राजेंद्र भारूड जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या समर्थनार्थ व हिना गावीत खासदार नंदुरबार यांच्या विरोधात  बिरसा क्रांती दल तालुका शाखा नवापूर तर्फे नुकतेच निवेदन देण्यात आले. निवेदन देताना तालुका अध्यक्ष राकेश वळवी, उपाध्यक्ष धिरसिंग वसावे, कार्याध्यक्ष प्रकाश नाईक, सचिव गिरीश वळवी व इतर काही आदिवासी बांधव उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबारच्या खासदार हिना गावीत  ह्या जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांच्या विरोधात खोटे आरोप करीत विनाकारण बदनामी करणारे रोज नवीन नवीन विडीओ बनवून सोशल मिडीयावर टाकत आहेत. एका कर्तव्य दक्ष अधिका-याला सुडबुद्धीने वारंवार वेठीस धरून संपूर्ण जिल्हा प्रशासनाला हिना गावीत बदनाम करीत आहेत. कोरोना काळात जिल्हा प्रशासनाचे काम उत्तम रित्या चालू असताना जिल्हाधिकारी नंदुरबार व इतर अधिका-यांवर बिनबुडाचे आरोप करत सोशल मीडीयावर विडीओ टाकून व वृत्तपत्रात खोट्या बातम्या देऊन नंदुरबार जिल्ह्याचे वातावरण खराब करीत आहेत. 

“नंदुरबार  बना देश का मिसाल, कलेक्टर हो तो ऐसा” अशा बातम्या देशभर फिरत असून देशभर राजेंद्र भारूड कलेक्टर नंदुरबार यांच्या ऑक्सीजन प्लांट व कोरोना नियंत्रण आणण्याच्या कामाचे कौतुक केले जात आहे. सुपरस्टार फिल्म अभिनेता अजय देवगण , अमिर खान, महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव सिताराम कुंटे, हिंदी न्यूज, मराठी न्यूज व इंग्रजी न्यूज चॅनेल वाले सुद्धा राजेंद्र भारूड यांच्या कामाचे कौतुक करत आहेत. 

सोशल मिडीवरही राजेंद्र भारूड यांच्या कामाची प्रशंसा लाखो प्रेक्षक करत आहेत. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने सुद्धा कोरोनाबाबतच्या नंदुरबार जिल्ह्यातील  कामाचे कौतुक केले आहे. अशा कौतूकस्पद वातावरणात हिना गावीत खासदार नंदुरबार ह्या राजेंद्र भारूड यांच्यावर खोटे आरोप करून जिल्हाधिकारी यांच्या मनाचे खच्चीकरण करत आहेत. 

जिल्हाधिकारी यांना कामात साथ द्यायचे सोडून त्यांची पाये खेचण्याचे काम करत आहे.राजेंद्र भारूड यांच्या सरकारी कामात वारंवार अडचणी निर्माण करत आहेत. म्हणून आम्ही हिना गावीत खासदार यांचा जाहीर निषेध करतो. एका लोकप्रतिनिधींनी कोरोना सारख्या या संकटकाळी जिल्हा प्रशासनाला कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी मदत करायचे सोडून नंदुरबार कलेक्टर यांचे मनोबल वाढविण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम खासदार हिना गावीत करीत आहेत. ही मोठी दुर्दैवाची व लाजीरवाणी बाब आहे. 

         

म्हणूनच दिनांक 16 मे 2021 रोजी दुपारी 2. 00 वाजता त्यांचा महाराष्ट्र भर विविध जिल्हा व तालुका व घराघरांतून स्वतःच्या घरासमोर उभे राहून जाहीर निषेध करणार आहोत. बिरसा क्रांती दल नंदुरबार जिल्हयासह विविध भागातील कार्यकर्ते एकत्र येऊन हिना गावीत यांच्या नंदुरबार येथील घरासमोर उभे राहून जाहीर निषेध नोंदविणारे आंदोलन करणार आहोत.

संबंधित लेख

लोकप्रिय