Tuesday, January 21, 2025

हातपंप देखभाल कर्मचाऱ्यांची राज्य बैठक संपन्न

हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा – कॉ. राजू देसले

वर्धा : महाराष्ट्र राज्य हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचारी संघटना (आयटक) ची राज्य बैठक ४ मार्च रोजी वर्धा आयटक कामगार केंद्र येथे आयटक राज्य सचिव कॉ. राजू देसले यांच्या अध्यक्षतेखाली तर आयटक राष्ट्रीय सचिव कॉ. बबली रावत (मुंबई )  राज्य अध्यक्ष राजेन्द जगताप नाशिक, आयटक राज्य उपाध्यक्ष उदय चौधरी ठाणे कॉ. प्रकाश बनसोड औरंगाबाद यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली .

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत हातपंप देखभाल व दुरुस्ती कर्मचारी १९८४ पासून कार्यरत असून राज्यातील नाशिक जळगाव पूणे नंदूरबार इत्यादी जिल्ह्यात सेवेत कायम केले तसेच इतर जिल्ह्यातील हातपंप देशभाल कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करुन शासकीय सेवेचे सर्व लाभ देण्यात यावे अशी मागणी आयटक राज्य सचिव कॉ. राजू देसले  यांनी केले.

कामगार कर्मचारी हक्कासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार करा – कॉम्रेड दिलीप पवार

हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यासाठी मंञालयातील बैठकीत  झालेल्या ठरावाची अमलबजावणी करा. जिल्हा परिषद येथिल कार्यरत हातपंप देखभाल दुरुस्ती योजनेकडील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू  करावा. देशव्यापी आयटक सह कामगार कर्मचारी संघटना नि केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरण विरोधात 28, 29 मार्च रोजी देशव्यापी संप होणार आहे. या संपात आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य हातपंप दुरुस्ती  देखभाल, यांत्रिकी कर्मचारी संघटना सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला, थकीत मानधन त्वरित द्या. सामाजिक सुरक्षा लागू करा.  इत्यादी मागण्या बाबत सविस्तर मार्गदर्शन केले प्रास्ताविक संघटनेचे  राज्य अध्यक्ष राजेन्द जगताप  यांनी केले.

ओमनाथ चौधरी (भंडारा), मुकेश दुर्गपाल (चंद्रपूर) नरेन्द बागडे (गोंदिया), विजय गेडाम यांनी विविध समस्या मांडले. संचालन मंसाराम सोनवने यांनी तर मुकुंदराव बडोले यांनी केले. बैठकीला राज्यभरातून ४५ पदाधिकारी उपस्थित होते.

नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण

भांडखोर सुन आहे, मग न्यायालयाचा ‘हा’ महत्वपूर्ण निकाल जरूर वाचा !

महाराष्ट्रातील अनिकेत जाधव याची फुटबॉलपटूची भारतीय फुटबॉल संघात निवड !


Related Articles

- Advertisement -

Latest Articles