मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही वर्गांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरु केले असले तरी ग्रामीण भागातील विद्यार्थी या ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आणि अद्याप एकही वर्ग सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे या वर्षीचे शैक्षणिक वर्ष ड्रॉप करण्याचा विचार सरकार करू शकते असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान केले आहे.
शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका दूरचित्र वाहिनीशी बोलत असताना त्यांनी या वर्षीचे शैक्षणिक वर्ष ड्रॉप करण्याचा विचार होऊ शकतो असे त्यांनी म्हंटले आहे. मात्र, वर्ष ड्रॉप करणार म्हणजे नेमके काय करणार याबाबत त्यांनी स्पष्टीकरण न दिल्याने निर्णय काय होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
दरम्यान, राज्यात अनेक शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन ऍडमिशन प्रक्रिया सुरू केली आहे. तर काही शैक्षणिक संस्थांना प्रवेश पूर्व परीक्षा अद्याप घेता आलेली नाही. तसेच प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याचे काम सुरु आहे परंतु अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा हा सर्वोच्च न्यायालयात पेंडिंग आहे.