Tuesday, May 7, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र विद्यालय मोहा शाळेचा SSC बोर्डाच्या परीक्षेचा 97.72 टक्के निकाल

महाराष्ट्र विद्यालय मोहा शाळेचा SSC बोर्डाच्या परीक्षेचा 97.72 टक्के निकाल

परळी वै: (प्रतिनिधी)तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नामवंत असलेल्या महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालयाचा मार्च 2020 एस.एस.सी बोर्ड परीक्षेत उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवत 97.72 टक्के निकाल लागला आहे.

शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे सर्व संचालक यांनी शालेय प्रशासन व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

एस एस सी मार्च 2020 या बोर्ड परिक्षेकरिता एकूण 266 विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरले होते त्यापैकी 264 विद्यार्थी बोर्ड परीक्षेला समोरो गेले होते. यामध्ये 133 विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले असून 102 विद्यार्थी प्रथम श्रेणी,20 द्वितीय श्रेणी,3 उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

शाळेने एस एस सी बोर्ड परीक्षेत आपली यशाची परंपरा कायम ठेवून तालुक्यातील ग्रामीण भागात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यारी शाळा म्हणून नावलौकिक कायम राखण्यात यश मिळविले आहे.

शाळेच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव ऑड.अजय बुरांडे, अध्यक्ष प्रा.बाबासाहेब सरवदे सर्व संचालक मंडळ यांनी शाळेचे प्रशासन, शिक्षक कर्मचारी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय