Sunday, May 19, 2024
Homeशिक्षणशंकर विद्यालय राहाटी (बु) ची उज्वल निकालाची परंपरा कायम

शंकर विद्यालय राहाटी (बु) ची उज्वल निकालाची परंपरा कायम

(नांदेड) : – आज दहावीचा निकाल जाहीर झाला. कै. विठ्ठलराव बोकारे शिक्षण प्रसारक संस्था संचलित शंकर  विद्यालय राहाटी बु. ने यावर्षी सुद्धा निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.

      शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील येणाऱ्या कु. संगीता खरबे (93.40%) आणि कु. संध्या उद्धव बोकारे (92%) यांनी शाळेतून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शाळेचे विद्यार्थी 22 हे विशेष प्राविण्य सह उत्तीर्ण झाले आहेत. 25 प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणीत 14 उत्तीर्ण झाले आहे.

     या प्रसंगी सर्व यशस्वी विद्यर्थ्यांचे व शाळेचे मुख्याध्यापक आर. डी. कांबळे आणि सर्वमार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष केशवराव बोकारे, सचिव मा. ह. लांडगे गुरुजी व सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय