Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याआमदार अमित गोरखे यांच्या बहुजन संवाद यात्रेला महाराष्ट्रभर उस्फूर्त प्रतिसाद

आमदार अमित गोरखे यांच्या बहुजन संवाद यात्रेला महाराष्ट्रभर उस्फूर्त प्रतिसाद

पुणे : बहुजन, दलित समाजाच्या विविध अडचणी जाणून घेण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी आमदार अमित यांनी ५ ऑगस्ट पासून राज्यभर बहुजन संवाद यात्रेला सुरुवात केली आहे. या यात्रेला दलित, बहुजन युवकांचा राज्यभर उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आमदार अमित गोरखे (MLA Amit Gorkhe) राज्यभर दलित वस्त्या, बौद्ध विहार तसेच अनेक ठिकाणी भेट देत आहेत. त्यांना लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बहुजन संवाद यात्रा महाराष्ट्र दौरा पारनेर दौऱ्या दरम्यान या गावातील मातंग वस्तीत जाऊन भेट दिली व काही विकास कामाचे भूमिपूजन केले. जवळे गाव, गुनोरे गाव, देविभोयरे गाव, अळकुटी गाव, टाकळी ढोकेश्वर गाव इत्यादी गावी अनुसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये भेटी दिल्या. (MLA Amit Gorkhe)

जालना येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा असे पाचोड रोड अंबड साईबाबा मंदिर येथील मातंग, बौद्ध वस्तीत जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधला. वडगाव मावळ येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सवात उपस्थित राहून तळेगाव, देहूरोड, सुदुंबरे येथील दलित वस्तीमध्ये भेट दिली. 

श्रीगोंदा दौरा दरम्यान घोडेगाव दौंड येथे अण्णाभाऊ साठे नगर लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, पारगाव, कोकणगाव, काष्टी येथील बहुजन वस्तीमध्ये भेट दिली. बारामती दौऱ्या दरम्यान भवानी नगर, अण्णाभाऊ साठे नगर कसबा, तांदळवाडी, वडगाव निंबाळकर येथील मातंग वस्ती, भाजप मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली.

पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, कळम, धाराशिव येथे उस्फुर्त स्वागत सर्व बहुजन समाजाने केले आहे. ही बहुजन संवाद यात्रा पूर्ण राज्यभर गावगावात, दलित आदिवासी वस्त्यांमध्ये जाणार असून त्यांच्या अडचणी, भावना या उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांच्या पुढे मांडणार असून दलितांना न्याय देण्याचे काम महायुती सरकार करेल असा विश्वास आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !

सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती

‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू

संबंधित लेख

लोकप्रिय