Soybean Price : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर परांडा येथे आयोजित महायुतीच्या सभेत भाजप नेते व कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला योग्य दर देण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सभेत पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या मनातील नाराजी जाणून घेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे सांगितले. “सध्या सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. परंतु आता येत्या चार दिवसांत सोयाबीनला अपेक्षित दर मिळेल,” असे पटेल यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे परांडा मतदारसंघातील उमेदवार तानाजी सावंत यांच्या कामाची प्रशंसा करताना, “तानाजी सावंत हे प्रेमापोटी जनतेला सोबत घेऊन कार्यरत आहेत,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “तानाजी सावंत हे परांडा किल्ल्याचे राखणदार असून त्यांच्या प्रेमापोटी जनतेने या सभेला हजेरी लावली आहे,” असे शिंदे म्हणाले. त्यांनी सावंत यांना “जादूगार” संबोधत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.
भाजप नेते पाशा पटेल यांच्या या घोषणेमुळे राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आता चार दिवसांत सोयाबीनला हमीभाव मिळण्याची अपेक्षा वाढली आहे.
Soybean Price
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा
ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत गेले ; छगन भुजबळ यांचा खळबळजनक दावा समोर
नरेंद्र मोदींची राज्यातील नऊ सभांची मोहीम सुरू; महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार
मुंडे बहीण-भावावर प्रवीण महाजन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप
महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर
तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा
उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर