जुन्नर : जुन्नर तालुक्यातील दिव्यांग लोकांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध योजना चा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वेळी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारूनही काम होत नाही. प्रत्येक वेळी अधिकारी अडवाउडवी चे उत्तरे देतात. या करीता श्री राधेश्याम दिव्यांग सशक्तिकरण केंद्र महाराष्ट्र राज्य ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष दिपक चव्हाण याच्या मार्गदर्शनात जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके याच्या निवासस्थानी जावून दिव्यांग, भुमिहीन बेघर, आदिवासी भिल्ल समाजातील लोकाच्या विविध अडचणी चे निवेदन देण्यात आले. (Solve the various problems of disabled, landless, homeless – demand to MLA Benke)
जुन्नर तालुकयातील जे दिव्यांग जागेवर झोपून आहेत व अतित्रिव्य दिव्यांग आहेत अश्या लोकांना ऑनलाइन प्रमाण तपासणी करीता जुन्नर ग्रामीण रूग्णालयात महीन्यात एकदा वैदयकीय अधिकारी येऊन जुन्नर येथे ज्या लोकांना युनिक कार्ड यु डी आई डी अजून भेटलेले नाही अश्या लोकांना तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग तपासणी करावी. दिव्यांग लोकांना मिटिंग करीता व दिव्यांग लोकाच्या विविध कार्यक्रम प्रक्षिशण करीता तालुकाच्या ठिकाणी दिव्यांग भवनाला जागा व दिव्यांग भवन बाधून मिळणे, तालुका स्तरावरावर दिव्यांग समिति स्थापन करणे सर्व दिव्यांग संस्था व संघटना चे पदाधिकारी याचा समिति मध्ये समावेश करावा.
दिव्यांग लोकांना व्यवसाय करण्या करीता ग्रामपंचायत, नगर पालिका हद्दीत 200 स्केअर फूट जागा व टपरी मिळणे, जुन्नर तालुकयातील दिव्यांग, भुमिहीन बेघर लोकांना विना अट जागा व घरकुल देण्यात यावी, जिल्हा परिषद कडून मिळणार्या दुर्धर आजार, उदरनिर्वाह भत्ता ची मंजूर यादी नुसार वेळेवर अनुदान बॅक खात्यात जमा होणे , तालुका स्तरावर शासन आपल्या दारी कार्यक्रम घेवून दिव्यांग भुमिहीन बेघर आदिवासी भिल्ल समाजातील लोकांनची जातीचे दाखला, आधार कार्ड, मतदान कार्ड, राशन कार्ड व इतर अनेक अडचणी मेळाव्याचे आयोजन करून सोडवण्यात यावी, दिव्यांग लोकांना आवश्यक साहित्य साधने मध्ये तीनचाकी सायकल, व्हीलचेयर, कुबडया, वाॅकर, काठी, कानाची मशीन, कॅलिपर, कृत्रिम हात, पाय, बुट व वाटप करण्यात यावी.
तसेच आमदार निधी प्रत्येक वर्षाचा 10 लाख रूपये प्रमाणे मागिल 4 वर्षाचा निधी खर्च करावा. ज्या ग्रामपंचायतीने 5% निधी आतापर्यंत खर्च केला नाही अश्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी. जुन्नर पश्चिम पट्ट्यातील लोकांना जुन्नर येथे येण्यासाठी उशीर झाला तर रात्री 10 नंतर एस टी बस ची सोय नाही. रात्री दिव्यांग व कुटुंबासोबत, महिला वर्गाची अत्यंत हाल होतात. या करीता रात्री 12 वाजेची नारायणगाव हून शेवटची एस टीटी बस जुन्नर ला पुन्हा सुरू करण्यात यावी.
तसेच जुन्नर जुना एस टी स्टॅन्ड वर येणाऱ्या – जाणाऱ्या एस टी बस जुन्या स्टॅन्ड वर थांबून दिव्यांग व जेष्ठ नागरिक, महीला वर्गाची येण्या-जाण्याची सोय करावी. अश्या अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी 25 तारखेला जुन्नर तालुकयातील सर्व दिव्यांग संस्था, संघटना व शासकीय कार्यालया संबधित अधिकारी च्या सोबत मिटिंग घेवून लवकर दिव्यांग भुमिहीन बेघर आदिवासी भिल्ल समाज व वंचित लोकाच्या विविध अडचणी सोडवण्यात येतील असे आश्वासन आमदार अतुल बेनके यांनी यावेळी दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण शेरकर, उपाध्यक्ष राहुल मुसळे, नंदाताई खोमणे, निता बनवटे, सौरभ मातेले, अमोल तळपे, हरी नायकोडी, वसंत शिंदे, विजय शेळके, माणिकराव वाघचौरे, केरभाऊ नायकोडी, सुरेश पडघम, सतिश कोल्हे, आदिवासी भिल्ल समाज चे सागर पवार, विलास नांगरे, सुदाम निकम, सुमित पवार, भास्कर बर्डे, जनसेवा पक्ष च्या उपाध्यक्षा वंदना वाघचौरे, प्रहार बेघर महिला संघटना व घुणीभांडी कामगार मजूर संघटना च्या अध्यक्षा नफिसा इनामदार, रजनी शहा, उपाध्यक्षा शम्मिम सय्यद, सिताबाई मुंढे, ललिता शिराळशेठ, गणेश शेटे, अन्शार सौदागर व दिव्यांग कार्यकर्ता उपस्थित होते.
बँक नोट मुद्रणालय अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पदवीधर, डिप्लोमा, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी!
बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत 499 पदांची भरती; ऑनलाईन करा अर्ज