Saturday, April 27, 2024
Homeजिल्हापत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन पत्रकारांच्या अडचणी सोडवा - एस. एम. देशमुख...

पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन पत्रकारांच्या अडचणी सोडवा – एस. एम. देशमुख यांची मागणी

इंदापूर / रवींद्र कोल्हे : पत्रकारांना ही भेटण्याची वेळ देत नाहीत. त्यांच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाचा कारभारही तसाच आहे. पत्रकारांच्या अनेक अडचणी असून कोरोना कालावधीत तब्बल १६० पत्रकारांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अद्याप पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळालेला नाही. तुम्ही जसं ग्राउंडवर काम करता त्याच प्रमाणे पत्रकारही ग्राउंडवर काम करतात. त्यांना शासनाने फ्रंटलाईन वर्कर दर्जा देऊन पत्रकारांच्या अडचणी राज्य सरकारकडे राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी व हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकार कडे मांडून सोडवाव्यात अशी मागणी मराठी पत्र पदीषदेचे अध्यक्ष एस. एम देशमुख यांनी केली.

जंक्शन (इंदापूर) येथे मराठी पत्र परिषद संलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार व डॉक्टर यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सोशल मिडीया निमंत्रक बापूसाहेब गोरे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर, सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष जनार्धन दांडगे, जिल्हा समन्वयक सुनिल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम सोहळा पार पडला.

यावेळी कोरोनाच्या काळामध्ये रुग्णसेवा देणाऱ्या डॉ.प्रशांत महाजन, डॉ.मच्छिंद्र हेगडे, डॉ.नागनाथ जगताप, लॅब टेक्निशन रेश्‍मा कुदळे-बोराटे, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे, उपपोलिस निरीक्षक अतुल खंदारे,नितीन लकडे यांच्या तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर, डॉ.विकास शहा, प्रशांत ननवरे, महेश स्वामी, शैलेश काटे, दादासाहेब थोरात,  सुरेश मिसाळ, नारायण मोरे, अमोल तोरणे, रियाज सय्यद, प्रशांत चवरे, मनोहर चांदणे, जावेद मुलाणी, राहुल ढवळे, नितीन चितळकर, काशिनाथ सोलनकर, तात्यासाहेब घाटे, हरीदास वाघमोडे, सचिन लोंढे, विनायक चांदगुडे, बाळासाहेब तांबे, आदम पठाण, शौकत तांबोळी, प्रदिप तरंगे, गजानन टिंगरे, सुरेश निडबने,प्रेमकुमार धर्माधिकारी, रामदास पवार, बाळासाहेब धवडे, अर्जुन भोंग, तुषार क्षीरसागर, पोपट मुळीक, सागर जगदाळे, गोकुळ टंकसाळे, सुरेश मिसाळ, प्रवीण नगरे, सुधाकर बोराटे, बाळासाहेब रणवरे, अशोक घोडके, जितेंद्र जाधव, सिद्धार्थ मखरे, उदयसिंह देशमुख, अमोल रजपूत,बाळासाहेब सुतार,इम्तियाज मुलाणी, शहाजीराजे भोसले,मनोज साबळे, रोहित वाघमोडे, निलेश भोंग, प्रसाद तेरखडकर, धनाजी थोरात यांचा सत्कार करण्यात आला.

इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजकुमार थोरात यांनी स्वागत, समन्वयक धनंजय थोरात यांनी प्रास्ताविक व जिल्हा सरचिटणीस सतिश सांगळे यांनी  आभार मानले.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय