Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीणनिसर्गाचे सवर्धन काळाची गरज : माझा प्राणवायू माझी जबाबदारी ग्रामसेवक माधव गावित

निसर्गाचे सवर्धन काळाची गरज : माझा प्राणवायू माझी जबाबदारी ग्रामसेवक माधव गावित

spot_imgspot_imgspot_imgspot_img

सुरगाणा ता.३१ (दौलत चौधरी) : एका झाडाचे महत्व काय असते, हे करोना सारख्या महामारीने शिकवले. या ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राणास मुकावे लागले. दिवसें दिवस जगलांचा होणारा ऱ्हास, चोरटी जंगलतोड, वृक्ष संवर्धन आणि संगोपन नामशेष होत चालले आहे. यामुळे अनेक जंगलांचा ऱ्हास होत चालला आहे.

जंगलांचे संवर्धन व संगोपनासाठी आज काळाची गरज निर्माण झाली असून यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. म्हणून माझा प्राणवायू माझी जबाबदारी प्रत्येकाने वृक्ष लागवड करुन स्विकारावी असे आवाहन भवाडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक माधवराव गावित यांनी वांगणसुळे येथे गोपाळकाला प्रसंगी वृक्षारोपण केले. वांगणसुळे सारख्या आदिवासी बहुल भागांत महिला मंडळ व तरूण मित्रमंडळ शालेय शिक्षक वृक्ष लागवड जनजागृती मोहीम हाती घेत हजारो विविध जातींच्या झाडांचे वृक्षारोपण केले. ही बाब अभिमानस्पद आहे. वृक्ष लागवडीचे उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाची सुरुवात ग्रामसेवक माधवराव गावित यांनी केली आहे.

“निसर्गाच्या संवर्धना करीता सर्वांनी वृक्षारोपण करीता हिरारीने सहभाग नोंदवावा; ग्रामपंचायत व वनविभागाच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबविला जात आहे. याला शाळा, संस्था, कार्यालय तसेच जलपरिषद मित्र परिवाराच्या या सुत्य उपक्रम प्रेरणादायी असून तालुक्यात वृक्ष वाढीसाठी भर घालणारा आहे. सर्वांनीच या उपक्रमात सहभाग घेत वृक्ष लागवड केली आहे”

– परशराम चौधरी (वृक्ष प्रेमी पोलीस पाटील)

ग्रामपंचायत भवाडा ग्रामसेवक माधवराव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली बेहडा, कुरुळ, आवळा, जांभळा, सीताफळ, चिंच, जामुन, शिवण, बांबू अशी फळझाडे विविध जातीच्या वृक्षांची ग्रामसेवक हस्ते शेतात, घर, बांधावर, रस्त्याच्या दुतर्फा लागवड करण्यात आली आहे. यावेळी ग्रामसेवक एम.पी.गावित, वनपाल जयेश आहेर, अल्का भोये, पोलिस पाटिल परशराम चौधरी, मुख्याध्यापक चौधरी, ग्रा.प.शिपाई मिनानाथ जाधव, मधुकर जाधव, गोविंद धूम, यादव जाधव जलपरिषदेचे सदस्य दौलत चौधरी आदी उपस्थित होते.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय